मुंडेसाहेबांच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एन्ट्री?; यशश्री मुंडेंची दसरा मेळाव्याला पहिल्यांदाच उपस्थिती...

Pankaja Munde : सावरगावात भगवान भक्तीगडावर यशश्री मुंडे यांची उपस्थिती होती.
Yashshree Munde Latest News
Yashshree Munde Latest NewsSarkarnama

बीड : भाजपचे दिवगंत नेते माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या दसरा मेळाव्याची परंपरा त्यांच्या कन्या माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) चालवत आहेत. त्यांचा दसरा मेळावा आज (ता.५ ऑक्टोबर) बीड जिल्ह्यातील भगवान बाबांचे जन्मगाव असलेल्या सावरगावात भगवान भक्तीगडावर होत आहे. त्यांच्या या मेळाव्यास महाराष्ट्रातील विविध भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येंने उपस्थिती लावली आहे.

दरम्यान, अनेक राजकीय मंडळी देखील व्यासपीठावर उपस्थित आहे. यामध्ये एक विशेष उपस्थिती म्हणजे गोपीनाथ मुंडे यांची तिसरी कन्या यशश्री मुंडे यांची आहे. याचा उल्लेखही बीडच्या खासदार प्रितम मुंडे यांनी आपल्या भाषणात आवर्जून केला आहे. यामुळे या दसऱ्याच्या मुहूर्तावर त्यांची राजकारण एन्ट्री होणार का?, अशी चर्चा सुरू झाली आहे. (Yashshree Munde Latest News)

Yashshree Munde Latest News
Beed : दसरा मेळाव्यासाठी प्रितम मुंडेंची गोपीनाथ गड ते भगवान भक्तीगड वाहन फेरी

गेल्या काही वर्षांपासून राज्यातीन अनेक राजकीय मंडळींनी आपल्या मुला-मुलींना राजकारणात सक्रिय केले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सावरगावात भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्याला यशश्री मुंडेंची पहिल्यांदाच उपस्थितीवरून चर्चा रंगत आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या मोठ्या दोन्हीही मोठ्या मुली पंकजा मुंडे आणि खासदार प्रितम मुंडे या आधीपासूनच राजकारणात सक्रिय आहेत. आता त्यांची तिसरी मुलगी राजकारणात येणार का?, असे चर्चा राजकीय वर्तूळात रंगत आहे.

Yashshree Munde Latest News
Pankaja Munde Live : खूर्चीसाठी मी राजकारणात नाही ; मी नाराज नाही..

दरम्यान, यशश्री मुंडे या कधीच राजकीय व्यासपीठावर फारशा दिसत नाहीत. आज त्या पहिल्यांदाच दसरा मेळाव्याला उपस्थित आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यशश्री मुंडे या पेशाने वकील आहेत. त्यांचा काही वर्षापुर्वी अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाकडून ‘प्रॉमिसिंग आशियाई स्टुडंट’म्हणून गौरवही करण्यात आला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com