Shivsena : कॅबिनेट मंत्री झालेल्या भुमरेंच्या मतदारसंघातील कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या

सुरत, गुवाहाटी, गोवा आणि मुंबई अशी 'देश भ्रमंती' करून राज्याचे रोजगार मंत्री संदीपान भुमरे आज पहिल्यांदाच आपल्या पैठण मतदारसंघात प्रगटले. (Minister Sandipan Bhumre)
Minister Sandipan Bhumre News Aurangabad
Minister Sandipan Bhumre News AurangabadSarkarnama

औरंगाबाद : शिंदे बंडात हिरारीने सहभाग नोंदवून मंत्रीमंडळात पुन्हा कॅबिनेट पटकावणाऱ्या रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघातच त्यांना थंड प्रतिसाद मिळाल्याचे पहायला मिळाले. (Shivsena) एकनाथ शिंदेंचे बंड, सुरत, गुवाहाटी, गोवा, मुंबई ट्रीप, सत्ता स्थापन आणि मंत्रीमंडळ विस्तारा पुन्हा कॅबिनेट मंत्री झालेले (Paithan) पैठणचे आमदार संदीपान भुमरे बऱ्याच दिवसांनी आपल्या मतदारसंघात गेले होते. तिथे त्यांच्या स्वागतासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पण या कार्यक्रमासाठी ठेवण्यात आलेल्या शे-दीडशे खुर्च्या देखील भरल्या नाही.

धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी दिनी झालेल्या या कार्यक्रमात खुर्च्या रिकामा राहिल्याने राजकीय वर्तुळात याची चर्चा सुरू झाली आहे. (Marathwada) शिवसेनेने देखील यावरून भुमरे यांच्या स्वागताला रिकाम्या खुर्च्या असे ट्विट करत टोला लगावला आहे. संदीपान भुमरे यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हापासूनच त्यांच्या पैठण मतदारसंघात नाराजी पसरली होती.

अनेकांना भुमरे यांचा निर्णय आवडला नाही, पाचवेळा आमदार म्हणून निवडून दिल्यानंतरही भुमरेंनी गद्दारी का केली? असा सवाल पैठणकरांनी विचारला होता. त्यामुळे शिंदे यांचे बंड यशस्वी होऊन ठाकरे सरकार पायउतार झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व पाचही बंडखोर आमदार आपापल्या मतदारसंघात परतले होते. शिरसाट, बोरनारे, सत्तार यांनी आपापल्या मतदारसंघात जोरदार शक्तीप्रदर्शन केले, गर्दी जमवली. पण भुमरे मात्र महिनाभर पैठणला फिरकले नव्हते.

मतदारांना आपला निर्णय आवडला नाही, याची जाणीव असल्यामुळेच त्यांनी पैठणला जाणे टाळले अशी चर्चा होती. दरम्यान, मतदारसंघात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भुमरे यांच्या पॅनलने जोरदार मुसंडी मारली. तरी देखील भुमरेंनी मतदारसंघात जाऊन शक्तीप्रदर्शन टाळले होते. युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचा बिडकीनला झालेला दौरा, त्याला मिळालेला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर काही कट्टर शिवसैनिकांनी भुमरे यांना फोन करून जाब देखील विचारला होता.

तेव्हा आपणही जोरदार शक्तीप्रदर्शन करू, तेव्हा किती गर्दी जमते ते पहायला ये, असे आव्हान भुमरेंनी दिले होते. मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर विमानतळापासून भुमरेंनी वाहन रॅली काढली होती, पण त्याला देखील जेमतेच प्रतिसाद मिळाला होता. आता दीड महिन्यानंतर मतदारसंघात पुन्हा मंत्री होऊन गेलेल्या भुमरेंच्या कार्यक्रमाकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले.

Minister Sandipan Bhumre News Aurangabad
सेना-ब्रिगेड युती : किती धूर निघावा तो.. दानवेंनी भातखळकरांना सुनावले..

कार्यक्रमातील रिकाम्या खुर्च्या दर्शवत शिवसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक ट्विट करत भुमरे यांना चिमटा काढला आहे. `सुरत, गुवाहाटी, गोवा आणि मुंबई अशी 'देश भ्रमंती' करून राज्याचे रोजगार मंत्री संदीपान भुमरे आज पहिल्यांदाच आपल्या पैठण मतदारसंघात प्रगटले. त्यांच्या स्वागताला पैठण मधील काही नागरिकांसह खूप रिकाम्या खुर्च्यांची देखील उपस्थिती होती`, असा टोला दानवे यांनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com