Eknath Shinde News : आम्हाला कुणाचीही संपत्ती नको, बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती..

Shivsena : बाळासाहेबांना तो बाण मी दिला होता, पण दिलेल्या गोष्टी कधी मी काढत नाही.
Eknath Shinde-Uddhav Thackeray News, Aurangabad
Eknath Shinde-Uddhav Thackeray News, AurangabadSarkarnama

Aurangabad News: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना (Shivsena) हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह आम्हाला दिल्याने विरोधक बिथरले आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यातून ते आमच्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत. आम्हाला कुणाच्याही संपत्तीचा मोह नाही, आम्हाला कुणाची संपत्ती नकोय, बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ते औरंगाबादेत बोलत होते.

Eknath Shinde-Uddhav Thackeray News, Aurangabad
Sanjay Shirsat News : शिवसेना भवन आमच्यासाठी मंदिर, त्यावर दावा कसा सांगणार ?

बाळासाहेबांना तो धनुष्यबाण मीच भेट म्हणून दिला होता, पण दिलेलं काढायची मला सवय नाही, असा टोला देखील मुख्यमंत्र्यांनी (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे यांना लगावला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, आम्ही धडाकेबाज निर्णय घेत आहोत त्यामुळे विरोधक घाबरले आहेत. यातूनच आमच्यावर खोटे आरोप केले जात आहेत, पण आम्ही त्यांना कामाने उत्तर देऊ.

बाळासाहेबांनी देव्हाऱ्यात ठेवून पुजा केलेला धनुष्यबाण दाखवून उद्धव ठाकरे भावनिक राजकारण करत आहेत. बाळासाहेबांना तो बाण मी दिला होता, पण दिलेल्या गोष्टी कधी मी काढत नाही. त्यावर काही बोलणार नाही. मला बोलायला लावू नका, मी बोललो तर अनेकांची अडचण होईल, असा इशारा देखील शिंदेंनी दिला.

एमपीएससीच्या प्रश्नावर आम्ही तोडगा काढतो आहे. दुपारी या विषयावर बोलताना माझ्याकडून अनावधानाने निवडणूक आयोग असा उल्लेख झाला. त्यावरून मला ट्रोल केल जात आहे. पण गेल्या काही दिवसांपासून निवडूक आयोगाचा विषयच डोक्यात असल्याने तसे झाले. काही लोकांना निवडणूक आयोगाची अॅलर्जी असल्यामुळे ते मला ट्रोल करत आहे, असा टोला देखील शिंदे यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com