Eknath Shinde Vs Danve : तू काय त्यांचा बाॅस आहेस का?

औरंगाबादचे शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शिंदे यांना आव्हान दिले होते.
Mla Ambadas Danve-Cm Eknath Shinde News Aurangabad
Mla Ambadas Danve-Cm Eknath Shinde News AurangabadSarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्यातील वाद आता पेटला आहे. शिंदे यांनी बंडखोरीत सहभागी होण्यासाठी मला फोन केल्याचा दावा केला होता. तसेच तुला आमदार करण्यासाठी मी खूप काही केले, असेही शिंदेंनी यांनी आपल्याला सांगितले होते. मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले आणि शिवसेना म्हणून तुम्ही ते केले, अशा शब्दांत दानवे यांनी आपण शिंदे यांना प्रत्युत्तर दिल्याचे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जाहीरपणे सांगितले होते.

आदित्य ठाकरे हे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी सध्या दानवे बैठका घेत आहेत. त्या बैठकांत बोलताना दानवे हे आक्रमकपणे शिवसेनेचे बाजू मांडत आहेत. त्यांच्या या आरोपाबद्दल शिंदे यांना आज मुंबईत पत्रकारांनी विचारले.

Mla Ambadas Danve-Cm Eknath Shinde News Aurangabad
धनुष्यबाण मिळविण्यासाठी एकनाथ शिंदे यांना गाठायचाय 188 चा आकडा!

मी दानवे याला बंडखोरीमध्ये सहभागी होण्यासाठी फोन केला नव्हता, असे स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की एकतर आमचे बंड नाही. मात्र जे आमच्यासोबत आमदार होते त्यांच्या कुटुंबियांना दानवे हा फोन करत होता. या आमदारांनी परत यावे म्हणून दानवे आग्रह धरत होता. हे मला कळाल्यानंतर मी त्याला फोन केला. तू काय त्या आमदारांचा बाॅस आहेस का, असा सवाल त्याला केला. असे सारे शिंदे यांनी थेटपणे पत्रकारांना सांगितले.

शिंदे यांच्या या प्रतिदाव्यानंतर दानवे काय उत्तर देणार, याची उत्सुकता आहे. औरंगाबाद येथील बंडखोर आमदार संजय शिरसाट, संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्या सभा होणार आहेत. त्यामुळे मराठवाड्यात आदित्य यांच्या दौऱ्याची उत्सुकता आहे. मात्र त्या आधीच बंडखोर आणि शिवसेना यांच्यातील खडाखडीला सुरवात झाली आहे. दानवे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना अंगावर घेत आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याला आता बंडखोर आमदार कसे उत्तर देणार यावर पुढील सामना रंगणार आहे. या आधी शिरसाट विरुद्ध दानवे असा वाद झाला होता. त्यात एकमेकांच्या बायका काढण्यापर्यंत प्रकरण गेले होते.

Mla Ambadas Danve-Cm Eknath Shinde News Aurangabad
शिवसेना कुणाची ; अरुणाचल प्रदेशाची पुनरावृत्ती होईल का ? उज्जल निकम म्हणाले..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in