बंडखोरांना शिव्या देणारे बांगर हे आमच्याकडे कसे आले, हे मुख्यमंत्री शिंदेंनीच सांगितले..

आमदार संतोष बांगर यांचा मला दोन दिवसांपूर्वी फोन आला, ते म्हणाले साहेब माझे चुकले मी तुमच्या सोबत यायला पाहिजे होते. (Mla Santosh Bangar)
Cm Eknath Shinde-Mla Santosh Bangar
Cm Eknath Shinde-Mla Santosh BangarSarkarnama

मुंबई : शिवसेना आमदार संतोष बांगर एकनिष्ठ म्हणून मतदारसंघात परतले तेव्हा त्यांचा शिवसैनिकांनी खांद्यावर उचलून घेत सत्कार केला. (Santosh Bangar) बांगर यांनी देखील ढसाढसा रडत `शिवसेनेशी गद्दारी करू नका, उद्धव साहेबांना त्रास देऊ नका`, असे आवाहन करत सहानुभूती मिळवली होती. तेच बांगर अचानक आज शिंदे गटात सामील झाले. त्यांच्या या `मत परिवर्तना` बद्दल स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सभागृहात माहिती दिली.

बांगर यांना मी या म्हणालो नव्हतो, ते स्वतः आले, असा दावा शिंदे यांनी केला. विश्वासदर्शक ठराव संमत झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनपर ठरावावर बोलतांना शिंदे यांनी बांगर सोबत कसे आले याचा किस्सा सांगितला. (Marathwada) एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर त्यांच्याकडे शिवसेना व अपक्ष आमदार मिळून ४९ सदस्यांचे संख्याबळ होते. आज त्यात एकाची भर पडून आता हा आकडा ५० वर पोहचला आहे.

आज शिंदे-फडणवीस सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावर सभागृहात मतदान होणार होते. तत्पुर्वी सत्ताधारी पक्षाचे आमदार मतदानासाठी विधानभवनात आले, तेव्हा कालच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करणारे कळमनुरीचे आमदार संतोष बागंर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत विधानभवनात दाखल झाले. अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना विजयाची खून देखील करायला लावली.

या अनपेक्षित एन्ट्रींने सगळेच चकीत झाले आणि बांगर हे शिंदेना जावून मिळाले हे देखील स्पष्ट झाले. बांगर आमच्याकडे कसे आले, याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली. ते म्हणाले, माझ्यासोबत सुरत आणि गुवाहाटीला जे मंत्री, आमदार आले ते स्वतःच्या मर्जीने आले होते, कुणाच्याही डोक्याला मी बंदूक लावली नव्हती. एवढेच काय तर नितीन देशमुख यांनी जेव्हा मला कुटुंबाला भेटायचे आहे, असे सांगितले तेव्हा त्यांना दोन कार्यकर्ते सोबत देऊन विशेष विमानाने परत पाठवले.

Cm Eknath Shinde-Mla Santosh Bangar
ऐंशी वर्षाचे पवार दौरे करतात, अजितदादा सकाळी सहाला भेटतात ; तुम्ही किती दौरे केले..

आमदार संतोष बांगर यांचा मला दोन दिवसांपुर्वी फोन आला, ते म्हणाले साहेब माझे चुकले मी तुमच्या सोबत यायला पाहिजे होते. माझी तिकडे येण्याची इच्छा आहे. मी त्यांना म्हणालो, तुमचा निर्णय आहे, तुम्ही घ्या, आणि आज ते आमच्यासोबत आहेत. ज्याला कुणाला शिवसेनेत आपल्यावर अन्याय होतोय, कामे होत नाहीत, नेते भेटत नाहीत, बाळासाहेबांचे विचार आता पाळले जात नाहीत, असे वाटले ते सगळे माझ्यासोबत जोडले गेले आणि म्हणून २० आमदारांचा आकडा आता ५० वर पोहचला आहे, असा दावा देखील शिंदे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com