सोमय्यांनी आरोप करताच माजी मंत्री अर्जून खोतकर यांच्या घरावर ईडीचा छापा

(It is learned that the ED also raided the office of the Market Committee.)अर्जून खोतकर यांच्यावर जालना रामनगर सहकारी साखर कारखाना खरेदीत शंभर कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप होता.
Ex.Minister Arjun Khotkar
Ex.Minister Arjun KhotkarSarkarnama

जालना : आठवडाभरापुर्वीच भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जून खोतकर (Arjun Khotkar) यांच्यावर जालना रामनगर सहकारी साखर कारखाना खरेदीत शंभर कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत राज्य सरकारच्या मालकीची शंभर एकर जागा, ज्याची बाजारात किमंत एक हजार कोटी आहे, ती देखील हडप करण्याचे खोतकर यांचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता.

त्यांनतर काही दिवसांतच ईडीने अर्जून खोतकर यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. जालना येथील खोतकर यांच्या निवासस्थानी आज सकाळीच ईडीचे पथक दाखल झाले असून कागदपत्रांची कसून तपासणी सुरू केली आहे. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरी छापा पडल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

खोतकर हे जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असल्याने बाजार समितीच्या कार्यालयावर देखील ईडीने छापेमारी केल्याची माहिती आहे. बारा जणांचे पथक सकाळी साडेवाठ वाजेपासून खोतकर यांच्या घरी तपासणी करत होते. औरंगाबाद येथील एक उद्योजक आणि व्यावसायिकांच्या घरी व कार्यालयावर काही दिवसांपुर्वी ईडीने छापे टाकले होते.

हे छापे याच प्रकरणाच्या तपासणीसाठी होते असा दावा देखील किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदे केला होता. शिवाय खोतकर यांच्या विरोधातील कागदोपत्री पुरावे आपण ईडी, इन्कम टॅक्स आणि राज्य व केंद्राच्या सहकार विभागाला दिले असल्याचे सोमय्या यांनी सांगितले होते. त्यांच्या आरोपानंतर आठवडाभरातच ईडीने खोतकर यांच्या घरावर धाड टाकली आहे.

Ex.Minister Arjun Khotkar
लातूरचे पालकमंत्री बाभळगांवला गडकरींनी केलेल्या रस्त्यानेच जातात ; निलंगेकरांचा टोला

२०१२ मध्ये रामनगर जालना सहकारी कारखान्यासाठी निविदा काढण्यात आली होती. सत्तर कोटी रुपये मु्ल्य असलेला हा कारखाना जागेसह ४२ कोटीचा ठरवण्यात आला होता. एका उद्योजक आणि व्यावसायिक मित्रांच्या मार्फत खोतकरांनी फसवणूक करून हा कारखाना विकत घेतल्याचा आरोप करण्यात आला होता.

उद्योजक मित्राला कारखाना खरेदी करण्यासाठी खोतकर यांनीच ४३ कोटी दिले आणि नंतर हा कारखाना अर्जुन शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने साडे सत्तावीस कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com