सत्तासंघर्ष सुरु असतानाच ईडीची एन्ट्री; शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकरांवर मोठी कारवाई

ED | Shivsena | Arjun Khotkar : अर्जुन खोतकर ईडीच्या रडारवर
ED Action on Arjun Khotkar News, Shivsena News
ED Action on Arjun Khotkar News, Shivsena NewsSarkarnama

जालना : राज्यात एका बाजूला शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडाळीनंतर सत्तासंघर्ष नाट्यमय वळणावर आले आहे. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला ईडीची पुन्हा एकदा एन्ट्री झाली आहे. शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्या जालना सहकारी साखर कारखान्यावर ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. (Arjun Khotkar Latest News)

ईडीने (ED) कारखान्याची जवळपास ७८ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. यात जमीन, एक रेसिडेन्शिलय प्लॅन्ट, एक बिल्डिंग आणि स्ट्रक्चर अशी संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ईडीकडून आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती देण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी ईडीने जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून साखर कारखान्यावर निर्बंध लावण्याचे आदेश ईडीने दिले होते. त्यानंतर या कारखान्याचा वापर विक्री आणि व्यवहार करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. गेल्या अनेक दिवसांपासून ईडी या प्रकरणाची चौकशी करत आहे. (ED | Arjun Khotkar Latest News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com