Bhumre : आधी लोक फोनवर वेडवाकडं बोलायचे, आता म्हणतात योग्य निर्णय घेतलात..

आम्ही पन्नास लोक आहोत, सगळ्यांना एकदा एकत्रित घेऊन बसा, त्यावेळी जो निर्णय घ्याल तो मान्य असेल, असेही भुमरे यांनी यावेळी स्पष्ट केले. (Mla Sandipan Bhumre)
Ex.Minister Sandipan Bhumre News
Ex.Minister Sandipan Bhumre NewsSarkarnama

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील सत्कार समारंभातील माजीमंत्री आमदार संदीपान भुमरे यांच्या भाषणाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. मंत्री असूनही उद्धव ठाकरे यांच्याकडून फाईलींवर न होणारी सही ते शिंदेकडून आकडेवारी सहीत योजनांचा होणार उल्लेख असा दोन नेत्यांमधील फरक दर्शवणारे त्यांचे विधान चांगलेच चर्चेत आहे. (Shivsena) शिवसेनेतील मोठा गट फुटून शिंदेसोबत गेला तेव्हा मतदारसंघ किंवा इतर ठिकाणाहून येणारे फोन, त्यातून वापरली जाणारी भाषा याचा देखील भुमरे यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला.

भुमरे म्हणाले, आम्ही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत बाहेर पडलो तेव्हा आम्हाला गद्दार, बंडखोर म्हणून संबोधल गेलं. रोज शकडो फोन यायचे, वेडवाकडं बोलायचे. पण आमचा उठाव यशस्वी झाला, एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले आणि आता येणारे फोन देखील सुखावणारे आहेत. (Marathwada) आधी वेडवाकडं बोलत होते, आता म्हणतात तुम्ही योग्य निर्णय घेतलात. हा बदल म्हणजे लोकांना शिंदे साहेबांनी आणि त्यांच्यासोबत जाण्याची आम्ही घेतलेली भूमिका पटू लागली आहे.

आम्ही गद्दारी केली नाही, आजही बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणूनच काम करतो, भगवा कधी सोडणार नाही, हे आता लोकांना समजू लागले. त्यामुळे येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आम्ही सगळ्या जिल्ह्यात भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास देखील भुमरे यांनी व्यक्त केला. मंत्रीपद, आमदारकी जाईल असं आम्हाला सांगितलं गेलं, पण आमचा शिंदेसाहेबांसोबत जाण्याचा निर्णय ठाम होता. त्यामुळे मंत्रीपद, आमदारकीची पर्वा केली नाही.

Ex.Minister Sandipan Bhumre News
ठाण्याला जाण्यासाठी बंगल्यावर आमदार जमले, अन् खैरे आले ; भुमरेंनी सांगितला किस्सा..

यापुढेही शिंदेसाहेब देतील ती जबाबदारी पार पाडू. मंत्रीपदावरून मुख्यमंत्र्यांची होत असलेली कसरत पाहता आम्ही पन्नास लोक आहोत, सगळ्यांना एकदा एकत्रित घेऊन बसा, त्यावेळी जो निर्णय घ्याल तो मान्य असेल, असेही भुमरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

सत्तार, शिरसाट यांनी मुंबईत कार्यकर्ते आणून तुमचा सत्कार केला. मी पण कार्यकर्ते आणू शकतो, पण पावसापाण्याचे दिवस आहे, तेव्हा पैठण मतदारसंघात, जिल्ह्यात आणि मराठवाड्यात एक भव्य मेळावा घेऊन तुमचा सत्कार करायचा आहे, त्यासाठी लवकर तारीख द्या, अशी विनंती देखील भुमरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. न भुतो न भविष्यती असा मेळावा आपल्याला घ्याययचा आहे, अशी इच्छा देखील भुमरेंनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com