दानवे भेटीत चव्हाण स्पष्टच म्हणाले, पीटलाईन औरंगाबादेतच हवी, त्यानेच मराठवाड्याला फायदा

औरंगाबाद-अहमदनगर-पुणे प्रकल्प पूर्ण झाल्यास वाळूज, रांजणगाव, शेंद्रा, सुपा, चाकण या औद्योगिक वसाहतींना मोठा फायदा होईल. ‘आयटी हब’ व ‘ऑरिक सिटी’ ला कनेक्टिव्हिटी मिळेल. (Marathwada)
Raosaheb Danve- Satish Chavan-Pandit
Raosaheb Danve- Satish Chavan-PanditSarkarnama

औरंगाबाद : मागील काही वर्षांपासून मराठवाड्यात विविध रेल्वे प्रकल्पांच्या घोषणा करण्यात आल्या. मात्र यातील अनेक प्रकल्प अजूनही कागदावरच आहेत. (Aurangabad) त्यामुळे औद्योगिक व पर्यटनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणारे मराठवाड्यातील प्रलंबित रेल्वे (Railway) मार्ग प्रकल्प तातडीने मार्गी लावावेत, अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्याकडे केली आहे.

मराठवाड्यातील विविध प्रलंबित रेल्वे मार्ग प्रकल्पासंदर्भात सतीश चव्हाण यांनी मंगळवारी (ता.२९) दिल्ली येथे रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन निवेदन दिले. औरंगाबाद-अहमदनगर-पुणे प्रस्तावित नवीन रेल्वे मार्ग करण्यासाठी खूप प्रयत्न झाले. मात्र प्रत्यक्षात औरंगाबाद-अहमदनगर रेल्वे मार्गाचेच सर्वेक्षण करण्यात आले.

औरंगाबाद-अहमदनगर-पुणे हा रेल्वे प्रकल्प पूर्ण झाल्यास औद्योगिकदृष्ट्या महत्वपूर्ण ठरणार आहे. या मार्गामुळे वाळूज, रांजणगाव, शेंद्रा, सुपा, चाकण या औद्योगिक वसाहतींना मोठा फायदा होणार असून यामुळे ‘आयटी हब’पुणे व औरंगाबाद येथील ‘ऑरिक सिटी’ला थेट कनेक्टिव्हिटी मिळण्याच्या दृष्टीने मदत होईल. तसेच यामाध्यमातून मराठवाड्यातील तरूणांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, याकडे चव्हाण यांनी दानवे यांचे लक्ष वेधले.

तसेच औरंगाबाद-जळगाव हा प्रस्तावित रेल्वे मार्ग देखील मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. जगप्रसिध्द अजिंठा येथील लेण्या पाहण्यासाठी देश-विदेशातून दरवर्षी हजारो पर्यटक याठिकाणी भेटी देतात. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने औरंगाबाद-जळगाव हा रेल्वे मार्ग झाल्यास पर्यटकांना अधिक सोयीचे ठरेल. या रेल्वे मार्गामुळे मराठवाड्यातील नागरिकांना मनमाडला फेरा घालून दिल्ली, नागपूरला जाण्याची गरज पडणार नाही, शिवाय प्रवाशांचे व पर्यटकांचे सहा तास वाचतील.

Raosaheb Danve- Satish Chavan-Pandit
Imtiaz Jalil : रेल्वे मंत्री खरंच सांगा, पीटलाईन जालन्यात होणार की औरंगाबादेत?

औरंगाबाद येथे रेल्वेची ‘पीटलाइन’व्हावी यासाठी आम्ही सातत्याने पाठपूरावा करत आहोत. मात्र ‘पीटलाइन’साठी चिकलठाणा येथील जागा अपूरी असल्याचे कारण देत रेल्वे बोर्डाने हा प्रस्ताव फेटाळला होता. उलट मागणी नसताना देखील जालना येथे ‘पीटलाइन’मंजूर करण्यात आली आहे.

जालना येथे ‘पीटलाइन’करायची असल्यास जरूर करावी मात्र औरंगाबाद येथे देखील ‘पीटलाइन’झाल्यास मराठवाड्यासाठी ते फायद्याचेच ठरणार असल्याचेही चव्हाण यांनी दानवेंना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. दानवे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच मराठवाड्यातील प्रलंबित रेल्वे प्रकल्प मार्गी लावले जातील, असे आश्वसन दिल्याचे चव्हाण म्हणाले. यावेळी माजी आमदार अमरसिंह पंडित देखील उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com