रावसाहेब दानवेंची नवी भविष्यवाणी : आणखी दोन महिन्यांत राज्यात काय होणार?, याचा अंदाज कोणी लावलाय?

महाविकास आघाडीचं सरकार जाईल, असं कोणालाही वाटत नव्हतं.
Raosaheb Danve
Raosaheb DanveSarkarnama

कन्नड (जि. औरंगाबाद) : शिवसेनेच्या (Shivsena) पोटात पहिल्यापासूनच काळं होतं. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) माध्यमातून त्यांनी अडीच वर्षे सरकार चालवलं. महाविकास आघाडीचं सरकार जाईल, असं कोणालाही वाटत नव्हतं. पण, अशी जादू झाली आणि एका रात्रीत सरकार गेलं. आता असं राजकारण चालल्यावर आणखी दोन महिन्यांनी काय होणार आहे, याचा अंदाज कोणी लावलाय का? नाही ना?, असा सवाल करीत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी नव्या राजकीय घडामोडींबाबत भविष्यवाणी केल्याचे बोलले जात आहे. (Due to Raosaheb Danve's statement, the new equation is being discussed in the state)

औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातील सिरजगाव येथील शेतीपूरक प्रकल्पाचा शुभारंभ आणि भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात रेल्वे राज्यमंत्री दानवे बोलत होते. दानवे यांनी आगामी काळात घडणाऱ्या घडामोडींबाबत सूचक विधान केली नाही ना, अशी चर्चा आत राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Raosaheb Danve
भाजपचा जिल्हाध्यक्ष होण्यास मी दोनवेळा नकार दिला होता; कारण... : कल्याणशेट्टींचे त्या गोष्टीवर भाष्य

केंद्रीय मंत्री दानवे म्हणाले की,आमच्याशिवाय सरकार बनत नाही, हे जेव्हा शिवसेनेच्या लक्षात आलं. तेव्हा विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीचा संपूर्ण निकाल हाती येण्याच्या अगोदरच त्यांनी माध्यमांसमोर जाऊन ‘आमचे सर्व पर्याय खुले आहेत,’ असे सांगितले. याचा अर्थ शिवसेनेच्या पोटात पहिल्यापासून काळं होतं. त्यांनी तीस वर्षांची जुनी शिवसेना-भाजपची युती तोडली. अडीच वर्षे झाले. महाविकास आघाडीचे सरकार जाईल, असं कोणालाही वाटत नव्हतं. पण, अशी जादू झाली की एका रात्रीत सरकार गेलं. आता असं राजकारण चालल्यावर आणखी दोन महिन्यांनी काय होणार आहे, याचा अंदाज कोणी लावलाय का?

Raosaheb Danve
आमदारकीसाठी इच्छूक अभिजित पाटलांनी ‘मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’ गाण्यावर धरला ठेका!

सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली आहे. यामुळे उद्या नेमकी राजकीय परिस्थिती काय असेल, याचा अंदाज बांधता येत नाही. कधी काय होईल, याचा नेम नाही. त्यामुळे जनतेची कामे करा, असा सल्ला रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी दिला. दानवे यांच्या या विधानामुळे आगामी काळात कोणती राजकीय समीकरणे उदयास येतात की काय, अशी चर्चा होत आहे. दुसरीकडे, दानवेंनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश तर दिले नाही ना असाही सूर उमटू लागला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com