Kailas Patil यांच्या आंदोलनाचा विमा कंपनीला दणका; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले जप्तीचे आदेश

Kailas Patil | उपोषणातील मागण्यांवर ठोस कार्यवाही झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार न घेण्यावर आमदार कैलास पाटील ठाम आहेत
Kailas Patil  |
Kailas Patil |

Osmanabad Farmers Agitation : उस्मानाबाद : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उस्मानाबादचे आमदार आणि शिवसेना (Shivsena) जिल्हाप्रमुख कैलास पाटील (Kailas Patil) मागील सहा दिवसापासून आ. पाटील हे आमरण उपोषणाला बसले आहेत. सहा- सात दिवसांनंतर अखेर आज कैलास पाटील यांच्या आंदोलनाचा मुजोर पिक विमा कंपनीला दणका बसला आहे.

उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी शेतकऱ्यांची उरलेली 373 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी पुण्यातील विमा कंपनीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या आदेशाची एक प्रत पुणे जिल्हाधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आली आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी जप्तीचे आदेश दिले असले तरी शेतकऱ्यांना पैसे मिळाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचं पवित्रा आ.पाटील यांनी घेतला आहे.

Kailas Patil  |
वातावरण तापलं! कैलास पाटलांच्या आंदोलनाला हिंसक वळण...

उपोषणातील मागण्यांवर ठोस कार्यवाही झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार न घेण्यावर आमदार कैलास पाटील ठाम आहेत. पण काल अचानक त्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. कुलूप बंद आंदोलन आणि टायर जाळून रस्ता अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर अनेक ठिकाणी बसेसचीही तोडफोड करण्यात आली. त्यानंतर एसटी सेवा काही तासांसाठी बंद करण्यात आली होती

२०२० च्या पीक विम्याची ५३१ कोटी रुपये जिल्ह्यातील तीन लाख ५७ हजार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ जमा करावी, ५३१ कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करताना शेतकरी संख्या, बाधित क्षेत्र आणि नुकसान भरपाईचा विमा रक्कमेत कोणतीही छुपी कपात करु नये. २०२१ च्या पीकविम्याची उर्वरित ५० टक्के म्हणजेच ३८८ कोटी रुपयांची रक्कम विमा पात्र सहा लाख ६७ हजार २८७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ जमा करावे. अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

त्यासोबतच, सप्टेंबर २०२२ मधील सततचा पाऊस, अतिवृष्टी, ढगफुटी, रोगराईमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी २४८ कोटी रुपये जिल्ह्यातील दोन लाख ४८ हजार ८०१ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे आजपर्यंतचे विमा व अतिवृष्टीचे एक हजार दोनशे कोटी रुपये तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत, या उपोषणातील मागण्यांवर ठोस कार्यवाही झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार न घेण्यावर आमदार कैलास पाटील ठाम असल्याचेही खासदार ओमराजे राजेनिंबाळकर यांनी सांगितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com