भाजपमुळेच औरंगाबादकर पाण्यापासून वंचित

सातत्याने महापालिकेच्या सभागृहात हे ओरडायचे, त्यामुळे साडेसातशे कोटीत होणारी पाण्याची योजना आता १६८० कोटींवर गेली. (Chandrakant Khaire)
भाजपमुळेच औरंगाबादकर पाण्यापासून वंचित
Khaire-Bagde-KaradSarkarnama

औरंगाबाद : मी खासदार असतांना शहरवासियांना चोवीस तास पाणी मिळावे म्हणून केंद्राकडून समांतर जलवाहिनी मंजुर करून आणली होती. त्यासाठी ७९२ कोटी रुपयांचा निधी देखील मंजुर झाला होता. (Bjp) भाजपचे दिवगंत नेते गोपीनाथ मुंडे यांचे देखील याकामी मला सहकार्य मिळाले. पण मुंडे यांच्या निधनानंतर जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांची भूमिका बदलली आणि त्यांनी समांतर जलवाहिनीच्या विरोधात भूमिका घेतली.

ही योजना पुर्ण होऊ द्यायची नाही, त्यात वारंवार खोडा घालण्याचे काम आज पाण्याच्या नावाने बोंब मारून आम्हाला दोष देणाऱ्यांनी केले. (Shivsena) समांतरला भाजपने विरोध केल्यामुळेचे आज शहरातील नागरिकांना पाण्यावाचून राहावे लागत आहे, असा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला.

भारत पेट्रोलियम व केंद्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यात पीएनजी गॅस पाईपलाईन प्रकल्पाच्या कामाचे भुमीपूजन आज थाटात पार पडले. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ.भागवत कराड, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रिमोटने या प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ केला. केद्रीय पेट्रोलियम व गृहनिर्माण मंत्री हरदिपसिंह पुरी यांनी आॅनलाईन शुभेच्छा देत हा प्रकल्प लवकर पुर्ण करण्याचे आश्वासन दिले.

महाविकास आघाडी व खासदार इम्तियाज जलील यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे पुर्णपणे भाजपचा ठरलेल्या या कार्यक्रमात दानवे, बागडे यांनी शिवसेना नेते खैरे यांच्यावर टीका करत त्यांनी वीस वर्षात काय केले? औरंगाबादकरांना पाणी का मिळाले नाही? असा सवाल केला होता. यावर सरकारनामाशी बोलतांना चंद्रकांत खैरे यांनी भाजपला खडेबोल सुनावले.

खैरे म्हणाले, भाजप फक्त घोषणा करते, प्रत्यक्षात काम काहीच करत नाही. गॅस पाईपलाईन टाकून डिसेंबरपर्यंत घरगुती गॅस देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. मग आधी करून दाखवा, मग बोला हे माझे त्यांना सांगणे आहे. शहर व जिल्ह्याच्या विकासात राजकारण आणायचे नाही ही आमची भूमिका आहे. त्यामुळे हा प्रकल्प पुर्ण झाला तर मी कराडांचे अभिनंदनच करीन. पण बिनबुडाचे आरोप करायचे आणि चर्चा घडवून आणायची असे उद्योग सध्या भाजपच्या नेत्यांकडून सुरू आहे.

मी या जिल्ह्याचा वीस वर्ष खासदार होतो. या काळात अनेक विकासाची कामे, योजना आणल्या पण त्याचा गाजावाजा कधी केला नाही. औरंगाबादचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न केले. पाठपुरावा केला, त्या त्या सरकारच्या काळातील मंत्र्यांच्या भेटीगाठी घेतल्या तेव्हा कुठे समांतर योजना मंजुर झाली. त्यासाठी साडेसातशे कोटींचा निधी देखील मिळाला, पण आज ओरड करणाऱ्या भाजपनेच या योजनेला विरोध केला.

Khaire-Bagde-Karad
Osmanabad : पवारसाहेबांनी क्षणाचाही विलंब न लावता उद्घाटनासाठी येण्यास होकार दिला...

सातत्याने महापालिकेच्या सभागृहात हे ओरडायचे, त्यामुळे साडेसातशे कोटीत होणारी पाण्याची योजना आता १६८० कोटींवर गेली. त्यामुळे २५ वर्षात पाणी देता आले नाही, अशी ओरड आणि आमच्यावर आरोप करण्याचा अधिकार डाॅ.कराड व भाजपच्या नेत्यांना नाही,असेही खैरे म्हणाले. राज्यसभेवर निवड आणि केंद्रात राज्यमंत्री पद मिळाल्यामुळे कराड यांच्या डोक्यात हवा गेली आहे. त्यांना पुन्हा २०२४ च्या लोकसभेचे डोहाळे लागले आहेत. पण लोकांच्या मनात काय आहे? हे त्यांना ठाऊक नाही, त्यांनी याचा कानोसा घ्यावा, असा सल्ला देखील खैरे यांनी कराडांना दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in