Latur News : डॉ. शिवाजीराव निलंगेकरांच्या स्मारक अनावरण सोहळ्याला सर्वपक्षीय नेते जमणार..

Marathwada : शिवाजीराव निलंगेकर पाटील हे ३ जून १९८५ ते ६ मार्च १९८६ दरम्यान महाराष्ट्राचे दहावे वे मुख्यमंत्री होते.
Let. Shivajirao Nilangekar Statue News, Latur
Let. Shivajirao Nilangekar Statue News, LaturSarkarnama

Marathwada : राज्याच्या जलसिंचनाचे प्रणेते व लातूर जिल्ह्याचे भाग्यविधाते कर्मयोगी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कै. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर (Shivajirao Patil Nilangekar) यांच्या स्मारकाचा अनावरण सोहळा गुरुवार ९ फेब्रुवारी रोजी होत आहे. दुपारी २ वाजता महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा येथे आयोजित या सोहळ्यासाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची हजेरी असणार आहे.

Let. Shivajirao Nilangekar Statue News, Latur
Osmanabad News : शिक्षक मतदारसंघात भाजपने शिंदे गटाच्या सावंतांची मदत का घेतली नाही ?

राज्याचे माजी मुख्यमंत्री अष्टपैलू व्यक्तिमत्व डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मारकाचे अनावरण माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते होणार आहे. (Latur) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील. (Marathwada) तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उपस्थीत राहणार आहेत.

शिवाजीराव निलंगेकर पाटील हे ३ जून १९८५ ते ६ मार्च १९८६ दरम्यान महाराष्ट्राचे दहावे वे मुख्यमंत्री होते. या शिवाय त्यांनी राज्यमंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, संसदीय कार्य, आरोग्य, तंत्रशिक्षण, दुग्धविकास, विधी व न्याय, सहकार, सांस्कृतिक कार्यमंत्री अशी विविध पद भूषवली होती. मुख्यमंत्रीपद भूषविल्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी महसूल खात्याचा कारभार पाहिला होता. १९९० ते १९९१ या काळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती.

ते पहिल्यांदा १९६२ मध्ये निलंगा मतदारसंघातू आमदार म्हणून निवडून गेले होते. पक्षाची पडझड होत असतानाही त्यांनी कधी निष्ठा बदलली नाही. सिंचनात त्यांनी केलेले काम दिशादर्शक ठरले. मागास भागाचा उत्कर्ष व्हावा यासाठी ते कायम झटले. लातूर, जालना हे जिल्हे आणि औरंगाबाद खंडपीठाच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा होता.

निलंग्यासारख्या मागास भागात शिक्षणाची गंगा नेत, त्यांनी शैक्षणिक संस्था उभारली. शिवाजीराव हे प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळविणारे ते पहिले मुख्यमंत्री होते. त्यांनी शोधप्रबंधात मराठवाड्याच्या विकासाचा वेध घेतला. एम. ए. आणि एलएल. बी. या दोन्ही पदव्युत्तर पदव्या त्यांनी मिळवल्या. त्यांच्या या कार्याची आठवण आणि गौरव म्हणून निलंग्यात त्यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ९ फेब्रुवारी म्हणजेच त्यांच्या जयंतीदिनीच या स्मारकाचे अनावरण होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com