Dr. Karad : खैरेंना दिल्ली कळाली असती, तर औरंगाबादेत उद्योग आले असते..

खैरेंनाच दिल्ली कळली नसल्याचे ते म्हणाले. मी नवीन आहे, दोन वर्षं मला खासदार होऊन झाले. ते वीस वर्षे खासदार होते. त्यांनी वीस वर्षांत केलेले काम बघा आणि मी दोन वर्षांत केलेले काम बघा. (Dr. Bhagwat Karad)
Dr.Bhagwat Karad-Chandrakant Khaire
Dr.Bhagwat Karad-Chandrakant KhaireSarkarnama

औरंगाबाद : `मी दिल्लीत नवीन आहे, मला खासदार होऊन दोनच वर्षे झालीत. मात्र चंद्रकांत खैरे हे वीस वर्ष खासदार होते. त्यांनी वीस वर्षांत केलेले काम बघा आणि मी दोन वर्षांत केलेले काम बघा. खैरे यांनाच खऱ्या अर्थाने दिल्ली कळलीच नाही. त्यांना दिल्ली कळली असती तर औरंगाबादेत उद्योग आले असते.' असा खोचक टोला केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी सोमवारी (ता.२५) शिवसेना नेते चंद्रकांत खैरेना लगावला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत रविवारी सोलापूर-धुळे महामार्गाचे लोकार्पण व चार महामार्गांच्या कामाचे भुमीपूजन औरंगाबादेत पार पडले. (Aurangabad) या कार्यक्रमात नितीन गडकरी यांच्याकडे मागण्या मांडताना केंद्रीय अर्थराज्यमंत्री कराड यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यावर टिका केली होती.

`मी खासदार झाल्यानंतर कमी कालवधीत शहरासाठी महत्वाचे प्रकल्प मंजूर करून आणले. मात्र, आमचे जुने मित्र माजी खासदार चंद्रकांत खैरे नेहमी सांगातात की यासाठी मी आधी पत्र दिले होते. हे तर असे झाली की मुलगी पाहिली नाही, लग्नही केले नाही. नुसातच गाजावाजा करायाचा, असे म्हणत टीका केली होती. या टीकेला चंद्रकांत खैरे यांनीही प्रत्युत्तर देत मीच महामार्गाच्या कामासाठी पाठपुरावा केला.

माझ्यामुळेच या रस्त्याचे काम झाले. केद्रीय मंत्री नितीन गडकरी हे चांगले काम करत आहेत. त्यांच्यामुळेच या कार्यक्रमाला आलो होते, असे सांगत डॉ. भागवत कराड हे दिल्लीत नवीन आहेत. त्यांना अजून दिल्ली कळली नाही, असा टोला लगावला होता. आज पुन्हा खैरे यांच्या टिकेला कराड यांनी 'ऑरीक सिटी परिसरात झालेल्या कार्यक्रमानंतर माध्यमाशी बोलतांना उत्तर दिले.

Dr.Bhagwat Karad-Chandrakant Khaire
MNS : `राज`,सभेसाठी `मनसे` तयारी, पण पोलिस परवानगीचे काय ?

खैरेंनाच दिल्ली कळली नसल्याचे ते म्हणाले. मी नवीन आहे, दोन वर्षं मला खासदार होऊन झाले. ते वीस वर्षे खासदार होते. त्यांनी वीस वर्षांत केलेले काम बघा आणि मी दोन वर्षांत केलेले काम बघा, यामुळे खऱ्या अर्थाने दिल्ली त्यांना समजली नसावी, किंवा मला दोन वर्षांत समजली नाही, हे त्यांना कळेल नसावे, असा खोचक टोला लगावला. कराड एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी वीस वर्षांत किती उद्योग आणले ते सांगावेत,असे आव्हानही खैरेंना दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com