मोठ्या भावाबद्दल असं बोलू नका, शिवसेना तुमच्यामुळेही फुटली होती..

पुत्र प्रेमामुळे शिवसेना फुटली हा त्यांचा आरोप चुकीचा आहे. शेवटी राजकारणात पुत्र प्रेम असतेच. (Chandrakant Khaire)
Chandrakant Khaire- Raj Thackeray News Aurangabad
Chandrakant Khaire- Raj Thackeray News AurangabadSarkarnama

औरंगाबाद : उद्धव ठाकरे हे राज यांचे मोठे बंधू आहेत, त्यांच्याबदल त्यांनी असं बोलू नये. शिवसेना तर तुमच्यामुळेही फुटली होती, अशा शब्दात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या टीकेला उत्तर दिले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल एका वृत्तवाहिनेला दिलेल्या मुलखातीत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.

उद्धव ठाकरे हे विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत, मी त्यांना जास्त जवळून ओळखतो, असे विधान राज ठाकरे यांनी आपल्या मुलाखती दरम्यान केले होते. यावर आता (Shivsena) शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी राज ठाकरे यांना मोठ्या भावाबद्दल असे बोलू नका,असे आवाहन वजा विनंती केली आहे.

खैरे म्हणाले, उद्धव ठाकरे हे राज यांचे मोठे भाऊ आहेत, तेव्हा त्यांच्याबद्दल अशी टीका करणे योग्य नाही. शिवसेना जेव्हा फुटली होती तेव्हा राज ठाकरे हे देखील त्याला कारणीभूत होते. त्यावेळी ते औरंगाबादेत आले असतांना त्यांचा मलाही फोन आला होता. मी त्यांना असे का केले हे विचारले होते. तेव्हा त्यांनी मला मी तुम्हाला माझ्याकडे बोलवतं नाही, पण माझ्याकडे येणाऱ्या कार्यकर्त्यांना तुम्ही रोखू नका, असे सांगतिले होते.

Chandrakant Khaire- Raj Thackeray News Aurangabad
Aurangabad : तू मला शहाणपणा नको शिकवू, जाब विचारणाऱ्या शिवसैनिकावर भुमरे भडकले..

पुत्र प्रेमामुळे शिवसेना फुटली हा त्यांचा आरोप चुकीचा आहे. शेवटी राजकारणात पुत्र प्रेम असतेच, आता ज्या एकनाथ शिंदे यांनी बंड केले, त्यांच्या मुलाला देखील शिवसेनेने खासदारकी दिली होती. तरी देखील त्यांनी शिवसेनेशी गद्दीर केली, असा आरोप देखील खैरे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com