पवारसाहेबांचा नाद करू नका, त्याचे उलटे परिणाम होतात.. मुंडेंचा भाजपला इशारा

(Ncp Leader) ज्यांचे १०५ आमदार आले, त्याला विरोधी पक्षनेता केला. (Dhnanjay Munde Warn Bjp) त्यामुळे `काही करा, पण पवारसाहेबांच्या नादी लागु नका
पवारसाहेबांचा नाद करू नका, त्याचे उलटे परिणाम होतात.. मुंडेंचा भाजपला इशारा
Dhananjay Munde-FadanvisSarkarnama

उस्मानाबाद ः `मायच्यान कुणाचाही नाद करा, पण पवार साहेबांचा करु नका. होत्याच नव्हत आणी नव्हत्याच होत करणाऱ्याच दुसर नाव आहे शरद पवार.` याचा अनुभव देखील या विरोधकाना आलेला आहे. विधानसभा निवडणुकीत ५६ आमदारांच्या पक्षाचा मुख्यमंत्री, ५४ वाला उपमुख्यमंञी तर ४४ वाल्याला मंञी केलं. अन ज्यांचे १०५ आमदार आले त्याला विरोधी पक्षनेता केला. त्यामुळे `काही करा, पण पवारसाहेबांच्या नादी लागु नका`, आसा इशारा सामाजिक न्याय मंञी धनंजय मुंडे यांनी पुन्हा भाजपा दिला.

कसबे तडवळे येथील जिल्हा राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या मेळ्यात ते बोलत होते. केंद्रातील सरकार हे सत्तेचा गैरवापर करुन ईडी सारख्या यंञणा विरोधकांना ञास देण्यासाठी वापरत आहे. एकदा पवार साहेबांना ईडीने नोटीस दिली होती. अख्खा महाराष्ट्र पेठुन उठाला होता. शेवठी ईडीलाच तोंडघशी पडावं लागल्याची आठवण देखील मुंडे यांनी विरोधकांना करून दिली.

मुंडे म्हणाले, आता पुन्हा एकदा ईडीचा आसरा घेतला जात आहे. पवार कुटुंबियांना ञास देण्यात येत आहे. त्यामुळे सावध राहा, पवार साहेबांना त्रास दिला तर त्याचे उलटे परिणाम होतात, असा टोला वजा इशारा देखील मुंडेंनी दिला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भगिनी व नातेवाईकांच्या कारखान्यांवर आयकर विभागाने छापासत्र सुरू केले आहे. या विरोधात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सोलापूर, पुण्यात रस्त्यावर देखील उतरले आहेत.

तर पाहुणे गेल्यानंतर मला काय बोलायचे ते बोलेन, आधी त्यांच्या पाहुणचार होऊ द्या, अशा शब्दांत शरद पवार, अजित पवार यांनी या कारवाईची खिल्ली उडवली होती. धनंजय मुंडे यांनी देखील या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भाजपला जुन्या घटनांची आठवण करून देत शरद पवारांचा नाद करू नका, असा इशारा दिला आहे. राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून मिरवणाऱ्या भाजपला व त्यांच्या १०५ आमदरांना शरद पवार साहेबांनीच घरी बसवले हे सांगायला देखील ते विसरले नाहीत.

Dhananjay Munde-Fadanvis
किशोरीताई, एखादा पेंग्विन कमी पाळा, पण खड्डे बुजवा ; राणेंचा खोचक टोला

पवार कुटुंबियांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्याचे उलटेच परिणाम होतात, याची देखील मुंडे यांनी यावेळी आठवण करून दिली. कसबे तडवळे येथील एस. पी. शुगर अँण्ड अँग्रो प्रा. लि. कारखान्याचा बाॅयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम तसेच जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. बांधकाम पाणीपुरवठा राज्यमंञी संजय बनसोडे, माजी आमदार राहुल मोटे, जिल्हा अध्यक्ष सुरेश बिराजदार, पक्षाचे राज्य चिटणीस तथा एस. पी. शुगरचे चेअरमन सुरेश पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती.

Related Stories

No stories found.