Beed News : धमक्या देवू नका, नाहीतर सगळा कच्चाचिठ्ठा बाहेर काढेन, करुणा मुंडेचा इशारा..

Maharashtra : मला आणि माझ्या मुलांना गेल्या तीन-चार महिन्यांपासून प्रचंड त्रास दिला जात आहे.
Karuna Munde
Karuna MundeSarkarnama

Marathwada News : मला गेल्या काही दिवसांपासून धमक्या दिल्या जात आहेत, पेट्रोल पंपावर जाळून मारून टाकू, असे फोन येत आहेत. हे कोणाच्या सांगण्यावरून केले जात आहे हे मला माहित आहे. पण मी घाबरणार नाही, २५ वर्ष प्रेमापोटी शांत राहिले, पण आता धमक्या दिल्या तर सगळा कच्चाचिठ्ठा बाहेर काढीन, असा इशारा करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी धनंजय मुंडे यांचे नाव घेत दिला आहे.

Karuna Munde
Sanjay Shirsat : आदित्य ठाकरेंना काय अक्कल ? त्यांनी फक्त टक्केवारी घेवून दुकानदारी केली..

बीडमध्ये (Beed) आलेल्या करूणा मुंडे यांनी आपल्या धनंजय मुंडेच्या कार्यकर्त्यांकडून अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करूणा मुंडे यांनी केला. बीड येथे प्रसार माध्यमांशी बोलतांना करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप केले. मला आणि माझ्या मुलांना गेल्या तीन-चार महिन्यांपासून प्रचंड त्रास दिला जात आहे.

मला फोनवरून मारून टाकण्याच्या धमक्या आणि घाण शब्द वापरून त्रास दिला जात आहे. पण मी अशा धमक्यांना घाबरणार नाही, मला मरण्याची देखील भिती नाही. पण धनंजय मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांकडून धमक्या देण्याऐवजी स्वतः मला मारून टाका, मला जिथे बोलावले तिथे मी यायला तयार आहे.

कार्यकर्त्यांकडून धमक्या देवून त्यांना अडचणीत आणू नका, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, तर त्यांचे आयुष्य बरबाद होईल. त्यानंतर तुम्ही त्यांच्याकडे पाहणार देखील नाहीत. माझ्या चारित्र्यांवर शिंतोडे उडवले जात आहे, मला खालच्या पातळीवर जावून बदनाम करता मग तुमचे नेते इतक्या खालच्या पातळीचे आहेत का? माझ्याशी २५ वर्ष संसार केला तेव्हा त्यांना माझे चारित्र माहित नव्हते का?

मला धमक्या दिल्या तर तुमचा सगळा कच्चाचिठ्ठा बाहेर काढीन, असेही करुणा मुंडे म्हणाल्या. करुणा मुंडे यांचा नुकताच आष्टीमध्ये एक कार्यक्रम झाला होता. त्यावेळी एका मुंडे समर्थकाने त्यांना धमकावल्याचा आरोप त्यांनी केला. या संदर्भात पोलिस अधिक्षकांकडे करुणा मुंडे यांनी तक्रार देखील दाखल केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in