Beed : मेटेंच्या पीचवरुन दरेकरांकडून मुंडेंना चिमटे; सत्ता केंद्र फडणवीसांकडे आल्याची स्तुती..

काम करत राहील्याने विरोधी पक्ष नेता बनलो. नाराज होऊन चालत नाही, संताप व्यक्त करून चालत नाही, राजकारणात संयम महत्वाचा असतो. (Pravin Darekar, Bjp)
Bjp Leader Pravin Darekar With Vinayak Mete in Beed
Bjp Leader Pravin Darekar With Vinayak Mete in BeedSarkarnama

बीड : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या समर्थनाथ आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रविण दरेकर यांच्या विरोधात घोषणाबाजीचा प्रकार घडल्यानंतर प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनीही नाव न घेता पंकजा मुंडे यांना चिमटे काढले. शिवसंग्रामच्या वतीने रविवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

पुरस्कारांचे वितरण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते झाले. दरम्यान, शहरात येत असताना दरेकर व फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शहरातही त्यांच्या वाहनाला आडवे येण्याचा प्रयत्न झाला. तसेच, विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या विधान परिषदेलाही यावेळी ब्रेक बसला. (Beed) या पार्श्वभूमीवर प्रविण दरेकर यांचे भाषण सल्ला देण्यासह कानटोचणारे ठरले.

लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात. सत्तेत नसताना मला विनायक मेटे यांनी बोलालवले अशी मेटेंचीही त्यांनी स्तुती केली. राज्य सरकारच्या संवेदना मेल्या आहेत. आमदारांनी कोणावर विश्वास आहे हे राज्यसभा निवडणुकीत दाखवून दिले. तीन तीन पक्ष, डझनभर नेते अन् इकडे एकटे देवेंद्र फडणवीस सर्वांना पुरून उरले. त्यावरुन आता सत्ताकेंद्र विरोधी पक्षनेत्याकडे म्हणजेच देवेंद्र फडणवीसांकडे आल्याचेही ते म्हणाले.

विनायक मेटे यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांचे वेगळे प्रेम असून त्यांना न्याय मिळणार. तत्पुर्वी एक वक्ता न्याय द्या, अन्यथा आमचा खलनायक होईल, यावर खलनायक बनून काही मिळत नाही, मेटेंना लोकनायक करायचे आहे, असेही दरेकर म्हणाले. पराभव झाला म्हणून रुसुन कोपऱ्यात बसलो असतो तर काहीच झाले नसते.

Bjp Leader Pravin Darekar With Vinayak Mete in Beed
Bjp : राऊत, वडेट्टीवार घरगडी, पण अपक्ष आमदार कुणाचे घरगडी नाहीत...

परंतु काम करत राहील्याने विरोधी पक्ष नेता बनलो. नाराज होऊन चालत नाही, संताप व्यक्त करून चालत नाही, राजकारणात संयम महत्वाचा असतो. माणूस पदाने नव्हे कर्तृत्वाने ओळखला जातो, पदांच्या मागे लागतो तेंव्हा पदे पुढे पाळतात, असे चिमटे त्यांनी नाव न घेता पंकजा मुंडे यांना काढले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com