Beed District
Beed DistrictSarkarnama

जिल्हा दुध संघ : मातब्बरांना पराभवाची धुळ; सत्ताधारी आघाडीचा मोठा विजय

सत्ताधारी आघाडीच्या मंजूळाबाई चौरे इमाव मतदार संघातून बिनविरोध विजयी झाल्या होत्या. शनिवारी १५ जागांसाठी निवडणुक झाली. (Beed District)

बीड : बीड जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाच्या पंचावार्षिक निवडणुकीत मातब्बरांना पराभवाची धुळ चाखावी लागली. (Beed) सत्ताधारी आघाडीने सर्वच जागांवर मोठ्या फरकाने विजय मिळविला. (Marathwada) शनिवारी (ता. आठ) मतदानानंतर निकाल जाहीर झाला. (Bjp) बीड जिल्हा सहकारी दुध संघाच्या १६ संचालकांच्या निवडीसाठी निवडणुक जाहीर झाली.

यात विद्यमान अध्यक्ष तानाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी दुध उत्पादक आघाडीच्या विरोधात शेतकरी विकास आघाडी निवडणुक रिंगणात उतरली होती. शेतकरी विकास आघाडीमध्ये माजी आमदार राजेंद्र जगताप, भाजपचे नवनाथ शिराळे, काँग्रेसचे शहादेव हिंदोळे यांच्या पत्नी निवडणुक रिंगणात होत्या. या आघाडीला उमेदवार मिळवितानाच दमछाक झाली होती.

१६ जागांपैकी या आघाडीने आठ उमेदवारांचे नऊ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. जीजाबाई शहादेव हिंदोळे या सर्वसाधारण व महिला राखीव अशा दोन मतदार संघातून निवडणुक लढल्या. दरम्यान, सत्ताधारी आघाडीच्या मंजूळाबाई चौरे इमाव मतदार संघातून बिनविरोध विजयी झाल्या होत्या. शनिवारी १५ जागांसाठी निवडणुक झाली.

यात दुध संघाच्या सर्व ४८ सभासद सहकारी दुध उत्पादक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी आठ ते दुपारी तीन या वेळेत मतदान प्रक्रीया पार पडली. त्यानंतर निकाल जाहीर झाला. यामध्ये दुध संघातील सत्ताधारी स्वाभिमानी शेतकरी दुध उत्पादक आघाडीने मोठ्या फरकाने विजय मिळविला.

Beed District
`औरंगाबादचे माॅडेल `यूपी`त नेणार.. भाजपला हरविण्यासाठी कोणाशीही युती`

विजयी उमेदवारांना ३४ ते ३६ मते मिळाली. तर, शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांना १२ ते १३ मतांवर समाधान मानावे लागले. माजी आमदार जगताप, नवनाथ शिराळे, जिजाबाई हिंदोळे आदींना पराभव पत्करावा लागला. विजयी आघाडीने गुलालाची उधळण करत जंगी मिरवणूक काढली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com