Opposition Leader Ambadas Danve-Cm Eknath Shinde News
Opposition Leader Ambadas Danve-Cm Eknath Shinde NewsSarkarnama

Shivsena : मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी पैशाचे वाटप , सरकारी यंत्रणेचा गैरवापर..

सभेला उपस्थित राहणाऱ्या प्रत्येकाला दीड हजार रुपये दिले जाणार आहेत,असेही दानवे म्हणाले. (Opposition Leader Ambadas Danve)

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची १२ तारखेला औरंगाबादला सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र या सभेला प्रतिसाद मिळणार नाही हे माहित असल्याने मंत्री संदीपान भुमरे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना कामाला लावले आहे. (Shivsena) लोकांनी सभेला उपस्थित रहावे म्हणून त्यांना पैसे दिले जात आहेत, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. (Aurangabad) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा गंभीर आरोप केला.

जिल्हा परिषद अंगणवाडी सेविका यांना सभेला उपस्थित राहण्याचे आदेश दिले असल्याचे एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. (Eknath Shinde) अशाप्रकारे सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग होत असून या सभेसाठी बोलवण्यात आलेल्यांच रेटकार्ड प्रसिद्ध झाले आहे. यानुसार सभेला उपस्थित राहणाऱ्या प्रत्येकाला दीड हजार रुपये दिले जाणार आहेत,असेही दानवे म्हणाले.

शिंदे फडणवीस सरकारने अतिवृष्टी पीडितांना ३ हजार कोटींची मदत योजना जाहीर केली आहे. अतिवृष्टी पीडितांना मदतीचे निकष १ हेक्टरने वाढवून सुद्धा प्रत्यक्षात मदतीची रक्कम कमी करण्यात आली आहे. अद्याप अनेक नुकसानग्रस्त भागात पंचनामा करण्यात आला नाही. सरकार एकप्रकारे आकड्यांचा खेळ करतेय.

Opposition Leader Ambadas Danve-Cm Eknath Shinde News
Aurangabad : हा तर कटाचा भाग, बंब यांना पंधरा वर्षात मुद्दा का सुचला नाही?

पिकांच्या प्रतवारी नुसार मदत करणे आवश्यक असताना सरकारने तुटपुंजी मदतीची फसवी घोषणा केल्याची टीकाही दानवे यांनी केली.अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्ते खचले, पूल वाहून गेले, त्याला कोणती मदत देण्यात आली नाही. त्यामुळे सर्वच नुकसानग्रस्तांचे सरसकट पंचनामे करा अशी मागणीही दानवे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com