मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसमोरच खैरे-दानवे यांच्यात जोरदार वाद!

औरंगाबाद जिल्ह्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून आता वादाला तोंड फुटले आहे.
Ambadas Danve-Uddhav Thackeray- Chandrakant Khaire
Ambadas Danve-Uddhav Thackeray- Chandrakant KhaireSarkarnama

मुंबई : औरंगाबाद शिवसेना (Shivsena) जिल्हाप्रमुखपदावरून पक्षाचे उपनेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) आणि आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोरच मातोश्रीवर (Matoshri) वाद झाला. या दोन्ही नेत्यांमधील खडाजंगी पाहून ठाकरे यांनी दोन्ही नेत्यांना सुनावलं. त्यानंतर दोघांमधील वादावर पडला, असे सांगण्यात आले. (Dispute between Chandrakant Khaire and Ambadas Danve in front of Uddhav Thackeray on Matoshri)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांनी बंड केल्याने शिवसेनेला खिंडार पडले आहे. विशेषतः मराठवाड्यातील आमदार बहुसंख्येने बंडात सहभागी झाले आहेत. त्यांच्या बंडानंतर शिवसेना संघटनेत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात येत आहे. शिंदे यांना ४० आमदारांबरोबरच लोकसभेतील १२ खासदारांनीही पाठिंबा दिल्याने शिवसेना अडचणीत आली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाकडून आमचीच खरी शिवसेना असा दावा करण्यात येत आहे.

Ambadas Danve-Uddhav Thackeray- Chandrakant Khaire
महादेव जानकर बारामतीतून पुन्हा दंड थोपटण्यास तयार; पण...

एकीकडे शिंदे गटाच्या बंडखोरी अडचणीत सापडलेल्या उद्धव ठाकरे यांच्यासमोरील अडचणी काही केल्या संपायला तयार नाहीत. कारण औरंगाबाद जिल्ह्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून आता वादाला तोंड फुटले आहे. औरंगाबाद शिवसेना जिल्हाप्रमुखपदी माजी आमदार किशनचंद तनवाणी यांची नियुक्ती केल्यानंतर माजी खासदार खैरे आणि विधान परिषद सदस्य अंबादास दानवे यांच्यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोरच मातोश्रीवर दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार वाद झाल्याचे पुढे आले आहे.

Ambadas Danve-Uddhav Thackeray- Chandrakant Khaire
बारामती जिंकणं शक्य; पण पवारसाहेबांच्या...: महादेव जानकरांनी सांगितली व्यूहरचना!

दोन्ही नेत्यांमधील वाद पाहून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोघांनाही सुनावल्याचे समजते. शेजारच्या खोलीत जा आणि दोघांमध्ये तोडगा निघाल्यानंतर माझ्यापुढे या, असे त्यांनी सांगितले. दोघांमधील वाद मिटविण्यासाठी किशनचंद तनवाणी यांना जिल्हाप्रमुख पदाऐवजी महानगर प्रमुखपद देण्यावर समझोता झाला. तनवाणी यांना स्वतंत्र जबाबदारी देण्यावर सहमती झाली आणि दोघांमधील वादावर पडण्यात टाकण्यात आल्याचे वृत्त एका वाहिनीने दिले आहे.

Ambadas Danve-Uddhav Thackeray- Chandrakant Khaire
जैस्वाल-तनवाणी वैयक्तिक आयुष्यातील मित्र, राजकारणात मात्र एकमेकांचे विरोधक

बंडखोर आमदार प्रदीप जैस्वाल यांची हकालपट्टी करत त्यांच्या जागेवर तनवाणी यांना महानगर प्रमुख करण्यात आले आहे. तनवाणी आणि जैस्वाल यांच्या मैत्रीचे आजही सांगितले जातात. पण यापुढे जैस्वाल विरुद्ध तनवाणी अशी लढत पहायला मिळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in