राज ठाकरेंच्या सभेला परवानगी कोण देणार? गृहमंत्री वळसे पाटलांनी नावच सांगितलं

राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला परवानगी मिळणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Dilip Walse Patil and Raj Thackeray
Dilip Walse Patil and Raj ThackeraySarkarnama

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या १ मे रोजीच्या औरंगाबादमधील सभेला परवानगी मिळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यातच पोलिसांकडून शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. अखेर यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनीच खुलासा केला आहे. सभेच्या परवानगीबाबतही त्यांनी उत्तर दिले आहे.

औरंगाबादमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज ठाकरेंची सभा घेतली जाणार आहे. या सभेबाबत औरंगाबादचे पोलीस आयुक्त एक-दोन दिवसात बैठक घेऊन निर्णय घेतील, यासाठी ते पोलीस महासंचालकांशीही चर्चा करणार आहेत, असे वळसे पाटील यांनी म्हटले आहे. यामुळे सभेला परवानगी देण्याचा अधिकार पोलीस आयुक्तांनाच असल्याचे एकप्रकारे त्यांनी स्पष्ट केले आहे. आता राज ठाकरेंच्या सभेबाबत पोलीस आयुक्त कोणता निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

Dilip Walse Patil and Raj Thackeray
नवनीत राणांना प्यायला पाणीही नाही? गृहमंत्री वळसे पाटलांनी थेट चौकशी करूनच दिलं उत्तर

दरम्यान, शहरातील जमावबंदी आदेशाबाबत पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, पोलिसांनी जमावबंदीचे आदेश हे सभेमुळे किंवा इतर कारणांमुळे दिलेले नाहीत. सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये याची खबरदारी म्हणून असे आदेश वर्षभर नियमित काढले जातात, हा एक नियमित प्रक्रियेचा भाग असून १४४ कलमाचे कुठलेही आदेश पोलिसांकडून काढण्यात आले नाहीत. राज ठाकरे यांच्या सभेबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही, निर्णय झाल्यावर आपल्याला माहिती दिली जाईल.

Dilip Walse Patil and Raj Thackeray
मोठी घडामोड : खार पोलीस ठाण्यात सोमय्या पोचताच गृहमंत्री थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबादेतील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या परवानगीसाठी मनसेने पोलिस आयुक्तांकडे अर्ज देखील दाखल केला आहे. परंतु सभेला पाच दिवस बाकी असतांना देखील त्यावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यातच पोलिस आयुक्तांनी शहरात ९ मे पर्यंत जमावबंदी आदेश लागू केल्याच्या बातम्या धडकल्या. सभेला परवानगी द्यायची नाही, म्हणूनच पोलीस आयुक्तांनी जमावबंदी आदेश लागू केल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com