जिल्हा बॅंकेच्या राजकारणातून दिलीप देशमुख निवृत्त, पुतण्या धीरजला दिली संधी

(Latur District Bank Election) डबघाईला आलेली ही बँक पुढे नफ्यात आणून राज्यातील क्रमांक एकची करण्यात दिलीपराव देशमुख यांचा सिहांचा वाटा होता.
Dilip Deshmukh- Dhiraj Deshmukh
Dilip Deshmukh- Dhiraj DeshmukhSarkarnama

लातूर ः गेली ३०-३५ वर्ष लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची यशस्वी धुरा सांभाळणारे दिलीप देशमुख यांनी आता बॅंकेच्या राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक सभा आणि जाहीर कार्यक्रमातून आपण आता थांबल पाहिजे, तरुणांना संधी दिली पाहिजे, असं दिलीपराव सांगायचे. आता त्यानी ते प्रत्यक्षात देखील आणलं आहे. दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्यानंतर दिलीप देशमुख यांनी जिल्हा बॅंकेचा कारभार एकहाती आणि यशस्वीपणे सांभाळला.

आता नव्या पिढीकडे या बॅंकेचे नेतृत्व सोपवण्याच्या हेतूने दिलीप देशमुख यांनी जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतून माघार घेत पुतणे आमदार धीरज देशमुख यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. काॅंग्रेस महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलकडून १९ जागांसाठी ३४ जणांनी अर्ज दाखल केले, त्यात दिलीपराव यांचा अर्ज नाही. याचाच अर्थ आता त्यांनी थांबण्याचा निर्णय घेत पुतणे धीरज यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक डबघाईला आली असतांना दिलीपराव देशमुख राजकारणात आले आणि विलासरावांनी जिल्हा बॅंकेला संकटातून बाहेर काढण्याची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवली. डबघाईला आलेली ही बँक पुढे नफ्यात आणून राज्यातील क्रमांक एकची जिल्हा बॅंक म्हणून नावारुपाला आणण्यात दिलीपराव देशमुख यांचा सिहांचा वाटा असल्याचे बोलले जाते.

विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतांना सहकार चळवळीला बळकटी देण्याचे काम झाले. ते पुढे नेण्याचे काम दिलीपराव देशमुख यांनी केले. आत्तापर्यंत जिल्हा मध्यवर्ती बँकेला देश व राज्य पातळीवर २३ पूरस्कार मिळाले आहेत. सलग ३० वर्षांपासून बँकेचे संचालक व मार्गदर्शक म्हणून दिलीपराव देशमुख कार्यरत आहेत.

बँकेने शेतकरी व सह.संस्था यांच्याबरोबर जिल्ह्यातील महिला बचत गट, शेतकऱ्यांना पिक कर्ज, शिक्षकांसाठी वैयक्तीक, गृह तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलींना लग्नासाठी शुभमंगल योजना कर्ज, शैक्षणिक कर्ज, रेशीम उद्योग व तीन लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज वाटप करत राज्यात नावलौकिक मिळवला.

एकीकडे दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बॅंकेची वाटचाल सुरू असतांना विरोधकांनी मात्र त्यांच्यावर घराणेशाही, लोकशाही पद्धतीने निवडणूका न होऊ देणे असे आरोप केले. त्याकडे फारसे लक्ष न देता संचालक मंडळ आणि दिलीप देशमुख काम करत राहिले. परंतु विधान परिषद निवडणूक न लढवता दुसऱ्याला संधी द्या, असे सांगत माघार घेणाऱ्या दिलीप देशमुख यांनी आता जिल्हा बॅंकेच्या राजकारणातून देखील बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

Dilip Deshmukh- Dhiraj Deshmukh
एका आण्याच्या गांजावरून सामना-तरूणभारतमध्ये रंगला ‘सामना’

हा निर्णय घेत असतांना जिल्हा बॅंकेची बसवलेली घटी पुन्हा विस्कटू नये, यासाठी त्यांनी पुतणे धीरज यांना जिल्हा बॅंकेच्या राजकारणात आणले. त्यांना उमेदवारी अर्ज भरायला लावून दिलीपराव यांनी थांबणे पसंत केले.

दिलीप देशमुख यांच्या या निर्णयाचे राजकीय वर्तुळ आणि त्यांच्या समर्थकांकडून कौतुक होत असले, तरी भाजप व अन्य विरोधकांकडून देशमुख यांच्यावर घराणेशाहीचा आरोप होत आहे. आता प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी सभासद व बॅंकेचे मतदार दिलीप देशमुख यांनी धीरज यांना प्रमोट करण्याच्या निर्णयाला पंसती देतात? की मग वेगळा निर्णय घेतात हे लवकरच स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com