Dhnnajay Munde : गोगलगायीनी पिडीत शेतकऱ्यांना तिप्पट मदत द्या..

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात सुमारे ४ हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रात गोगलगायीनी उगवलेले सोयाबीन खाऊन टाकले. (Mla Dhnanjay Munde)
Mla Dhnanjay Munde News, Mumbai
Mla Dhnanjay Munde News, MumbaiSarkarnama

मुंबई : बीड, लातूर व उस्मानाबादसह काही जिल्ह्यातील सोयाबीन पिकांचे गोगलगायिनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. (Beed) तीन-चार वेळा पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनाही पीकही हाती लागले नाही. अशा शेतकऱ्यांना कपाशी वर पडलेल्या बोंड अळीवर ज्याप्रमाणे विशेष मदत देण्यात आली, त्याप्रमाणे गोगलगायीनी नुकसान केलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची गरज आहे.

झालेल्या नुकसानीची दाहकता व प्रमाण पाहता राज्य सरकारने अतिवृष्टी बाधित (Farmaers) शेतकऱ्यांना नुकत्याच जाहीर केलेल्या एनडीआरएफच्या निकषापेक्षा तिप्पट मदत द्यावी, अशी लक्षवेधी माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांनी आज विधानसभेत मांडली.

या लक्षवेधीवर राज्य सरकारच्या वतीने कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, सदर नुकसानीची माहिती राज्य शासनास पूर्णपणे प्राप्त व्हावी यासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ, शास्त्रज्ञ व अभ्यासक अशा पाच अधिकाऱ्यांची समिती नेमून गोगलगायीनी केलेल्या नुकसानीचा अभ्यास व पडताळणी करण्यात येत आहे. समितीचा अहवाल मागवला जाईल त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल.

Mla Dhnanjay Munde News, Mumbai
Abdul Sattar : लोकल गाडीत बसण्याची इच्छा होती, पण मुख्यमंत्र्यांनी दिली लक्झरी..

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात सुमारे ४ हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रात गोगलगायीनी उगवलेले सोयाबीन खाऊन टाकले. वारंवार शेतकरी गोगलगायी गोळा करून त्यांवर मीठ टाकून त्यांना नष्ट करत. मात्र, पुन्हा पेरणी केली तरी तीच परिस्थिती उद्भवत आहे. यामुळे तीन-चार पेरण्या करूनही गोगलगायीचे नियंत्रण नाही आणि पिकही हाती लागणार नाही, अशी बिकट परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे.

त्यांना आर्थिक मदत मिळण्याबाबत धनंजय मुंडे यांनी पाठपुरावा केला. याआधीही त्यांनी तीन वेळा राज्य शासनाकडे याबाबत पत्राद्वारे विनंती केली होती. त्यानंतर आज धनंजय मुंडे यांनी विधानसभेत हा विषय लक्षवेधी द्वारे मांडल्यानंतर कृषी मंत्र्यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेत, अभ्यास समिती नेमून आर्थिक मदतीचे आश्वासन दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com