लातूर जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदी धीरज देशमुख बिनविरोध

दिलीप देशमुख यांनी बॅंकेच्या कारभारातून निवृत्ती जाहीर करत तरुण पिढीकडे नेतृत्व सोपवणार असल्याचे सांगितले होते. (Latur District Bank)
Dilip Deshmukh-Dhiraj Deshmukh
Dilip Deshmukh-Dhiraj DeshmukhSarkarnama

लातूर ः राज्यात सर्वाधिक गाजलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी काॅंग्रेसचे (Congress) आमदार धीरज देशमुख यांची तर उपाध्यक्षपदी अॅड. प्रमोद जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. (Marathwada) नुकत्याच झालेल्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत २० पैकी १९ संचालक काॅंग्रेसचे विजयी झाले होते. (Latur District Bank) तर एक जागेवर समसमान मते मिळाल्यामुळे टाॅसवर भाजपच्या एका संचालकाचा विजय झाला होता.

आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया झाली. अध्यक्षपदासाठी लातूर ग्रामीणचे आमदार व नवनिर्वाचित संचालक धीरज देशमुख तर उपाध्यक्षपदासाठी अॅड. प्रमोद जाधव यांनी अर्ज दाखल केले होते. त्यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने या दोघांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

लातूर जिल्हा बॅंक ही सहकार क्षेत्रातली नावजलेली बॅंक म्हणून ओळखली जाते. दिवंगत नेते विलासराव देशमुख, त्यांच्यानंतर त्यांचे बंधू माजी मंत्री दिलीप देशमुख यांनी या बॅंकेचे अध्यक्षपद भुषवले होते. नुकतीच दिलीप देशमुख यांनी बॅंकेच्या कारभारातून निवृत्ती जाहीर करत तरुण पिढीकडे नेतृत्व सोपवणार असल्याचे सांगितले होते.

पुतणे धीरज देशमुख यांची जिल्हा बॅंकेच्या राजकारणात एन्ट्री झाली आणि ते तरुण नेतृत्व म्हणजे धीरज देशमुख हेच असणार हे देखील स्पष्ट झाले होते. त्यानूसार आज त्यांची अध्यक्षपदी निवड झाली. यंदाची निवडणूक आरोप-प्रत्यारोप आणि विरोधी पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्याच्या प्रक्रियमुळे चांगलीच गाजली.

Dilip Deshmukh-Dhiraj Deshmukh
महाआरती करायला निघालेल्या भाजप शहर-जिल्हाध्यक्षाला अटक

पुढे प्रकरण न्यायालयात गेले आणि विरोधी पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आणि १० संचालकांसाठीची निवड प्रक्रिया पार पडली. काॅंग्रेसच्या पॅनलचे दहा उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आल्यामुळे बॅंक पुन्हा देशमुखांच्याच हाती जाणार हे स्पष्ट झाले होते.

दहा पैकी ९ संचालक पुन्हा काॅंग्रेसच्या पॅनलचे निवडून आले, एक जागा नशिबाने विरोधी पक्षाकडे गेली. त्यामुळे पुढील पाच वर्ष बॅंकेचा कारभार आमदार धीरज देशमुख यांच्या हाती असणार आहे. राज्यभरातील काॅंग्रेस नेत्यांनी धीरज देशमुख यांचे या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in