Dharashiv News : चाळीस वर्ष लाल दिवा दिला, त्यांना सोडून खेकडा मंत्र्यांच्या हाताखाली काम करतायेत..

Ncp : आता एका मतदारसंघापूरते मर्यादित झाले आहेत. पूर्वी मालक होते मात्र आता भाजपामध्ये सालगडी झाले.
Mehboob Shaikh-Mla Rana patil News, Dharashiv
Mehboob Shaikh-Mla Rana patil News, DharashivSarkarnama

Marathwada : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना ज्यांना मानाचे स्थान मिळायचे, असे आमदार राणा पाटील यांच्यावर भाजपमध्ये गेल्यानंतर प्रा.तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ आल्याचा टोला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी धाराशिव येथील मेळाव्यात लगावला.

Mehboob Shaikh-Mla Rana patil News, Dharashiv
Amol Kolhe On belgaon : बेळगावचा 'बेळगावी' उल्लेखानंतर अमोल कोल्हेंचा माफिनामा !

खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी ज्यांच्या खांद्यावर विश्वास टाकून दोन जिल्ह्याची जबाबदारी अन् ४० वर्ष लाल दिवा दिला. (Ncp) तेच लोक पवार यांना सोडून दुसऱ्या पक्षात गेले, ते आता एका मतदारसंघापूरते मर्यादित झाले आहेत. पूर्वी मालक होते मात्र आता भाजपामध्ये सालगडी झाले असून खेकडा मंत्र्यांच्या हाताखाली काम करत आहेत.

तुमच्यावर पवार यांनी विश्वास ठेवला साहेबांना तुमची गरज होती अगदी तशा पडत्या काळात तुम्ही साथ सोडली. त्यावेळी तुम्ही सत्ता येणार नसल्याचा विचार करुन भाजपात गेलात. राज्यातील युवकांनी पवार साहेबांना साथ दिली असुन तुमची खरी ओळख जनतेलाही झाल्याची टीका शेख यांनी केली.

पावडर खाऊन तयार केलेली बॉडी, जमीन विकून आलेला पैसा व पवार साहेबांना सोडून गेलेली व्यक्ती राजकारणात जास्त काळ टिकत नसल्याचे सांगत शेख यांनी राणा पाटील यांच्यावर टिकेचा भडीमार केला. काय होतास तू, काय झालास तू वेड्या असा कसा वाया गेलास तु, अशी टिकाही शेख यांनी केली.

तुळजापूर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी जाऊन प्रभागात पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून पक्ष संघटना मजबूत करावी. तुळजापूर मतदारसंघातून त्यांना घरची वाट दाखवावी, असे आवाहन शेख यांनी यावेळी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com