Dhananjay Munde News: पुन्हा मुंडेंविरुद्ध मुंडे! ''२००९ मध्ये मला निवडणूक लढवू दिली असती तर...''

Beed Politics: राज्यासह देशात सत्ता, एखादा तरी उद्योग आणून दाखवाच...
Dhananjay Munde News
Dhananjay Munde NewsSarkarnama

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. सातत्याने दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतात. आता धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेवर निशाणा साधताना मोठं विधान केलं आहे.

परळी तालुक्यातील धर्मापुरी येथे जलजीवन मिश्रांतर्गत कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. मुंडे म्हणाले, भूमिपूजनाचं श्रेय घ्यायचं असेल तर अवश्य घ्यावं, परंतू, १० वर्ष मंत्री असताना परळी मतदारसंघाचा विकास आपण का केला नाही यांचही श्रेय आपल्याला घ्यावं लागेल. पण जर २००९ मध्ये मला निवडणूक लढवू दिली असती तर मतदारसंघ १५ वर्षांत पुढे गेला असता असं म्हणत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पंकजा मुंडेंवर निशाणाही साधला आहे.

Dhananjay Munde News
Karnataka Assembly Election : तोंडसुख घेणारे कानडी नेते आता महाराष्ट्रातील नेत्यांना पायघड्या घालणार!

सिरसाळा येथील एमआयडीसीवरून पंकजा मुंडे यांना आव्हान दिलं आहे. मुंडे म्हणाले, राज्यासह देशात सत्ता आहे. मग तुम्ही मी आणलेल्या सिरसाळा एमआयडीसीमध्ये एखादा तरी उद्योग आणून दाखवा, मी स्वतः रस्त्यावर उतरून तुमचं स्वागत करेल. तसेच काशी विश्वनाथाचं जेवढं महत्त्व आहे तेवढेच महत्त्व परळीच्या प्रभु वैद्यनाथाचे देखील आहे. हे खासदार प्रीतम मुंडेंना माहिती हवं होतं असाही टोला मुंडे यांनी यावेळी लगावला.

Dhananjay Munde News
Uddhav Thackeray News : ठाकरेंच्या सभेचे उर्दू भाषेत बॅनर ; जावेद अख्तर, गुलजारांचे उदाहरण ते बाळासाहेबांना उत्तर...

...ही माझ्यासाठी शरमेची बाब!

आमदार धनंजय मुंडे म्हणाले, वंदे भारत ट्रेन बनवण्याचा कारखाना हातातून निसटला. हजारो कोटी रुपयांचा प्रकल्प दुसरीकडे गेला ही माझ्यासाठी शरमेची बाब आहे. १० वर्ष तुम्ही मंत्री होता मग या परळी मतदारसंघाचा विकास का केला नाही असा सवालही मुंडे यांनी उपस्थित केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com