Dhananjay Munde: धनंजय मुंडेंचं व्हिडीओ ट्वीट चर्चेत ; लेकीच्या 'त्या' प्रश्नावर लयभारी उत्तर देत जिंकलं मन

Republic Day 2023 : राजकीय व सामाजिक कार्याच्या गडबडीतील आयुष्यात असे क्षण आनंद देऊन जातात...
Dhananjay Munde
Dhananjay Mundesarkarnama

Dhananjay Munde Tweet Viral : देशभरात आज ७४व्या प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. राज्यातही विविध ठिकाणी सरकारी कार्यालयं, शाळा, महाविद्यालयं अशा सर्वट ठिकाणी ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. याचदरम्यान माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी एक व्हिडीओ टि्वट केला आहे. या व्हिडीओ पोस्टद्वारे त्यांनी लेक आदिश्रीसोबतचा खास क्षण शेअर केला आहे.

आमदार धनंजय मुंडे( Dhananjay Munde) यांनी व्हिडीओ पोस्ट शेअर करण्यात आली आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.या व्हिडीओत मुंडे यांनी अपघातामुळे सध्या घरी विश्रांती घेत असताना माझी मुलगी आदीश्रीसोबत गप्पा मारायला वेळ मिळतो आहे.प्रजासत्ताक दिनाबद्दलच्या तिच्या प्रश्नाचे समाधान केले. राजकीय व सामाजिक कार्याच्या गडबडीतील आयुष्यात असे क्षण आनंद देऊन जातात असं म्हणाले आहेत. मुंडे आणि लेक आदीश्रीसोबतचा हा खास क्षण सर्वांचंच मन जिंकत आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त टि्वटवर शेअर केलेल्या व्हिडीओत धनंजय मुंडे यांनी बीडमधील त्यांच्या निवासस्थानातील प्रसंग आहे. यात मुंडे हे पलंगावर झोपलेले असून त्यांच्या शेजारी त्यांची मुलगी आदिश्री उभी आहे. हातात भारताच्या राष्ट्रध्वजाचा एक फोटो घेऊन धनंजय मुंडे लेकीला प्रजासत्ताक दिनापाठीमागची संकल्पना समजून सांगताना पाहायला मिळत आहे.

Dhananjay Munde
Jalgaon politics; मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला न्याय मिळेल का?

मुंडे म्हणतात, बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना नोव्हेंबर महिन्यात बनवली. ती नंतर सरकारने स्वीकारली. २६ जानेवारीपासून आपल्या देशात राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळेच आपण २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणतो अशी माहिती लेक आदिश्रीला मुंडे देत आहेत.

Dhananjay Munde
Jitendra Awhad News : "पवारांबाबत आदराने बोला.. " ; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने आंबेडकरांना सुनावलं

रुग्णालयातील डिस्चार्जनंतर डॉक्टरांचा आरामाचा सल्ला

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला 5 जानेवारीला अपघात झाला होता. परळीहून आपल्या राहत्या घरी जाताना हा अपघात झाला होता.या अपघातात धनंजय मुंडे यांच्या छातीला मार लागला होता. तसेच त्यांच्या दोन बरगड्याही फ्रॅक्चर झाल्या होत्या. गेल्या 16 दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मुंडे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या त्यांची प्रकृती सुधारली असून पुढील काही दिवस आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in