Beed : धनंजय मुंडेंचे गडकरींना परळी भेटीचे आमंत्रण ; जिल्ह्यातील रस्ते कामांचा प्रस्तावही दिला..

गडकरी यांनी देखील धनंजय मुंडे यांचे निमंत्रण स्वीकारले असून ते जुलै महिन्यात परळीला येणार असल्याची माहिती मुंडे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. (Dhnanjay Munde)
Beed : धनंजय मुंडेंचे गडकरींना परळी भेटीचे आमंत्रण ; जिल्ह्यातील रस्ते कामांचा प्रस्तावही दिला..
Minister Dhnanjay Munde Meet Central Minister Nitin GadkariSarkarnama

बीड : राज्याचे सामाजिक न्याय तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी नुकतीच दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी गडकरींना एका रस्त्याचे लोकार्पण आणि दुसऱ्याचा शुभारंभ करण्यासाठी परळीला या, असे निमंत्रणही दिले. जिल्ह्यातील रस्ते व उड्डाणपुलांसदर्भातील निवेदन देखील मुंडे (Dhnanjay Munde) यांनी या भेटीत दिले.

जिल्ह्यातील विविध रस्त्यांचे विस्तारीकरण, चौपदरीकरण, उड्डाणपुलांची कामे अशा विविध विकास कामांचा प्रस्ताव घेऊन धनंजय मुंडे दिल्लीत गेले होते. (Beed) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत त्यांनी जिल्ह्यातील विकास कामांच्या मागण्यांचे निवेदन गडकरींना दिले, तसेच परळीला या असे निमंत्रण व तसे आश्वासन घेऊनच परतले.

बीड जिल्ह्यातील महत्त्वाच्या रस्त्यांचे विस्तारीकरण, विविध पुलांची उभारणी यासह विविध कामांना मंजुरी देण्याची मागणी घेऊन मुंडे यांनी गडकरी यांची भेट घेतली. त्याचबरोबर परळी ते अंबाजोगाई या रस्त्याचे काम आता अंतिम टप्प्यात असल्यामुळे या रस्त्याचे लोकार्पण व परळी ते सिरसाळा रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी नितीन गडकरी यांनी परळीला यावे, असा आग्रह देखील धरला.

Minister Dhnanjay Munde Meet Central Minister Nitin Gadkari
Raosaheb Danve: फडणवीस `शतरंज के बादशाह`, आता आम्ही नवी चाल खेळू..

गडकरी यांनी देखील धनंजय मुंडे यांचे निमंत्रण स्वीकारले असून ते जुलै महिन्यात परळीला येणार असल्याची माहिती मुंडे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in