Dhnanjay Munde : प्रत्येक निराधाराचा मला आधार व्हायचंय..

कोरोनामध्ये दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना प्रत्येकी ५ लाखांचे धनादेश, एक पालक गमावलेल्या बालकांना प्रतिमाह ११०० रुपये संगोपन निधी देण्यात आला. (Dhnanjay Munde)
Dhananjay Munde News, Latest Political News in Marathi
Dhananjay Munde News, Latest Political News in MarathiSarkarnama

परळी : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून मला निराधार, दिव्यांग, विधवा, परित्यक्त्या यांसारख्या सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकांची सेवा करायची संधी मिळाली. (Parli) विशेष सहाय्य योजनांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य, अनुदान याव्दारे या निराधार व दुर्बल घटकांचे आयुष्य सुखकर करता यावे, यासारखा दुसरा आनंद कशातच नाही. परळी तालुक्यातील २५ हजार लाभार्थी या योजनेतून लाभ मिळवत असुन, आणखी जास्तीत जास्त लाभार्थींना लाभ मिळवून देऊन इथल्या प्रत्येक निराधाराचा आधार मला व्हायचं आहे, अशा शब्दात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (Dhananjay Munde News)

परळी येथे आयोजित मिशन वात्सल्य व विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थींना लाभ वितरण व संवाद मेळाव्यात धनंजय मुंडे बोलत होते. (Marathwada) परळी येथे प्रथमच मिशन वात्सल्य अंतर्गत कोविड मध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या लाभातून दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना प्रत्येकी ५ लाखांचे धनादेश, एक पालक गमावलेल्या बालकांना प्रतिमाह ११०० रुपये सांगोपन निधी , विधवा झालेल्या महिलांना घरकुल योजनेचा लाभ, यासह विधवा महिलांना नगर परिषदेच्या माध्यमातून ५ हजार रुपयांची आर्थिक मदत आदी योजनांच्या लाभाचे वितरण करण्यात आले.

त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेतून नवीन लाभ मंजूर झालेल्या महिलांना मंजुरी प्रमाणपत्राचे वाटप, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतील लाभार्थींना एकरकमी २० हजार रुपयांचे धनादेश वाटप, अंत्योदय योजनेतील रेशन कार्ड वाटप, महिला आर्थिक विकास महामंडळाकडून बचत गटांना प्रत्येकी दीड लाख रुपयांच्या कर्जाचे वाटप यासह श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थीना मंजुरी पत्रांचे वाटप या महामेळाव्यात करण्यात आले. परळी येथे संपन्न झाला.

यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, कोविड काळात आमच्या सहकाऱ्यांनी ग्रामीण व शहरी भागातील लोकांना सर्व प्रकारची मदत केली, त्याचे मी कौतुक करतो. कोविड काळातील निर्बंधांमुळे मतदारसंघातील जनतेशी असलेला संवाद काही प्रमाणात कमी झाला होता, त्यामुळे ज्याप्रमाणे परळी शहरात दर रविवारी संवाद अभियान सुरू केले आहे, त्याचप्रमाणे ग्रामीण भागात प्रत्येक गावात जाऊन माय बाप जनतेशी संवाद साधणार आहे.

Dhananjay Munde News, Latest Political News in Marathi
ब्रिजभुषण सिंहाना रसद कोणी पुरवली? मनसेकडून सुप्रिया सुळे, शरद पवारांसोबतचे फोटो ट्विट...

मतदारसंघात विशेष सहाय्य विभागाच्या किंवा आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांना आधार देणाऱ्या कोणत्याही योजनेतील एकही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी एक मोहीम हाती घेऊन काम करावे, त्यांना कोणतीही अडचण आल्यास मी पाठीशी उभा आहे. विविध योजनेतील प्रलंबित अर्ज देखील तातडीने निकाली काढा असे आदेशही मुंडे यांनी यावेळी दिले.

मुंडेनी वाढली पंगत..

दरम्यान प्रथमच मोठ्या प्रमाणावर आयोजित या निराधार मेळाव्यास हजारो लाभार्थी व नागरिकांची उपस्थिती होती, या महामेळाव्यात आलेल्या सर्वांसाठी संयोजन समितीने भोजनाची सोय कार्यक्रमानंतर केलेली होती. कार्यक्रम संपताच महिला मंडळाची पंगत जेवायला बसली, मोठी पंगत जेवायला बसल्याचे पाहून, वाढण्यात कमतरता होऊ नये म्हणून स्वतः धनंजय मुंडे जेवण वाढायला सरसावले.

महिलांच्या पंगतीत कुठे द्रोण, कुठे चपाती तर तिथे वरण वाढताना मंत्री महोदयांना पाहून सारेच जण कुतूहलाने पाहत होते. परळीच्या मातीशी आणि इथल्या लोकांशी माझी नाळ जोडलेली आहे, असे मुंडे आपल्या भाषणात नेहमीच सांगत असतात. जेवायला बसलेल्या लोकांची तारांबळ होऊ नये म्हणून मंत्री असुन सुद्धा स्वतः जेवण वाढायला आलेल्या धनंजय मुंडेंना पाहून याची प्रचिती उपस्थितांना आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in