Politics : जखमी असतानाही धनंजय मुंडे पक्षासाठी मैदानात; म्हणाले, 'राह मे खतरे कितने भी हो...'

Dhananjay Munde : व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून केलं जोरदार भाषण
Dhananjay Munde
Dhananjay Munde Sarkarnama

Dhananjay Munde : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे गेल्या काही दिवसांपासून उपचार घेत आहेत. त्यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला. यामध्ये त्यांना दुखापत झालेली आहे. यामुळे त्यांना कोणत्याही कार्यक्रमांना उपस्थिती लावता येत नाही. पण त्यांनी आज विधान परिषदेच्या शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून थेट प्रचाराचे भाषण केले आहे.

औरंगाबाद (Aurangabad) शिक्षक मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे (NCP) उमेदवार विक्रम काळे यांच्या प्रचाराचे भाषण व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून केले. त्यामुळे त्यांच्या या भाषणाची चांगलीच चर्चा रंगली आहे. एवढंच नाही तर त्यांनी भाषणादरम्यान शेरो-शायरी देखील केली.

Dhananjay Munde
Nashik : पदवीधरच्या प्रचार तोफा थंडावल्या : शेवटच्या सभेत तांबे-पाटील मतदारांना काय म्हणाले?

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले, ''भाजपच्या सात पिढ्यांना देखील विक्रम काळे कसे जिंकतील हे कळणार सुद्धा नाही. विक्रम काळेंना तीन वेळा निवडणून दिले आहे आणि आता चौथ्या वेळेस देखील ते निवडून येतील असा विश्वास आहे. या निवडणुकीत कोण-कोण कोठून मतदान करतं? हे फक्त मतदारांनाच माहिती असतं. मतदार हे विक्रम काळे यांना मतं देतील, असा विश्वास मला आहे'', असं मुंडे यावेळी म्हणाले.

Dhananjay Munde
Imtiaz Jalil News : योग्यवेळी बोलू, शिवसेना-वंचित युतीवर एमआयएमची सावध भूमिका..

यावेळी भाषणादरम्यान मुंडे म्हणाले, ''राह मे खतरे कितने भी हो लेकीन डरता कौन है. मौत कल आती है आज आ जाए डरता कोन है. तेरे लष्कर के मुकाबले मै अकेला हूँ, फैसला मैदान मे होता है, मरता कौन है...'' असं म्हणत त्यांनी जोरदार भाषण केलं.

दरम्यान, धनंजय मुंडे यांची प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी पक्षाच्या उमेदवाराचा व्हिडिओ कॉन्फरन्स माध्यमातून प्रचार केला. त्यामुळे त्यांच्या या भाषणाची चर्चा होत आहे.

Dhananjay Munde
Eknath Shinde News : इंडिया टुडे-सी वोटरच्या सर्व्हेची मुख्यमंत्र्यांनी उडविली खिल्ली, म्हणाले "राजकारणात..."

तसेच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकाच्या जाहीर प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. गेल्या काही दिवसांपासून पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. त्यामुळे आता निवडणुकीच्या निकालानंतर कोणत्या पक्षाचे उमेदवार बाजी मारतात? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com