बीडबद्दल लिहिताना जरा तरी विचार करा : धनंजय यांनी पंकजांना सुनावले

मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
बीडबद्दल लिहिताना जरा तरी विचार करा : धनंजय यांनी पंकजांना सुनावले
पंकजा मुंडे, धनंजय मुंडेSarkarnama

औरंगाबाद : खळबळजनक आरोप करत रिव्ह्राॅल्व्हरच्या मागणीसाठी बीडच्या (Beed) जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रामार्फत मागणी करणारे अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंते संजयकुमार कोकणे यांच्या या प्रकरणानंतर बीडचे राजकारण चांगलेच तापले. याबाबत भाजपनेत्या (BJP) पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर जोरदार टीका केली. यावर धनंजय मुंडे यांनी पंकजांवर पलटवार करत आपण ज्या जन्मभूमीत जन्म घेतला त्या भूमीबद्दल काय लिहाव काय बोलाव याचा विचार केला पाहिजे, असे सुनावले आहे.

पंकजा मुंडे, धनंजय मुंडे
फडणवीस घरी गेलेल्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश अन् राऊतांचा अचूक बाण

मुंडे म्हणाले, जो अधिकारी बीड जिल्ह्यात कार्यरत होऊन पंधरा दिवस देखील झालेले नाहीत, त्या अधिकाऱ्याला स्वतःच्या जिवाची काळजी वाटते त्याने अजून कुठल्या बिलावर देखील सही केलेली नाही. पंधरा दिवसापूर्वी जॉईन झाला आणि पंधरा दिवसात कलेक्टर यांना देखील पत्र लिहिलं. ही बीड जिल्ह्याची बदनामी असून ही सहन केली जाणार नाही. जर कोणी अधिकाऱ्याला असे काही करत असेल तर, ते देखील खपवून घेतले जाणार नाही. अधिकाराच्या मागे सरकार म्हणून आम्ही ताकदीने उभे राहू व सामान्य नागरिक देखील उभे राहतील. चांगल्या कामासाठी अधिकाऱ्यांनी काम करणे देखील गरजेचे आहे, असे मुंडे यांनी स्पष्ट केले.

पंकजा यांनी या घटनेवरून `बीड जिल्ह्यात एक कार्यकारी अभियंता स्वसंरक्षणासाठी रिव्हाॅल्व्हरची मागणी करतो, किती दुर्दैवी. बीलासाठी राजकीय ठेकेदार यांचा दबाव, सर्व प्रकारचे माफिया कारभार बीडच्या नावाला काळीमा फासणारे आहेत, याची वैधानिक दखल घ्यावी`, अशा शब्दांत धनंजय मुंडे यांच्यावर त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली होती. यास उत्तर देतांना मु्ंडे यांनी पंकजांचे नाव न घेता चांगलेच सुनावले आहे. ते म्हणाले की, ज्याला त्याला संविधानाने दिलेला अधिकार आहे. व्यक्त होणे हे यासंदर्भातील अधिकार आहेत. ते संविधानाने दिलेले आहेत. मात्र, अशा पद्धतीची घटना समोर आल्यानंतर आणि माध्यमांनी ब्रेकिंग केल्यानंतर सत्ता पक्षाच्या विरोधात एखादी संधी मिळाली तर, ती संधी घेऊन त्या ठिकाणी बोलले जाते. पण यामुळे जिल्ह्याची बदनामी होते, अशावेळी सगळ्याच राजकीय पक्षांनी व नेत्यांनी आपण ज्या भूमीत जन्मला आलो त्या भूमीच्या बाबतीत काय लिहावे काय बोलावे या बाबतीत विचार केला पाहिजे. असा अप्रत्यक्ष टोला पंकजा मुंडेंना लगावला आहे.

पंकजा मुंडे, धनंजय मुंडे
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, आता कुलगुरू होण्यासाठी मंत्रालयात लॉबिंग होणार

औरंगाबाद घर नकार प्रकरणी चौकशीअंती कारवाई केली जाईल..

औरंगाबाद येथील उच्चशिक्षित वकीलास सदनिका जर नाकारली असेल तर, कायद्याद्वारे त्या विकासकावर कायद्यानुसार कारवाई होईल. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झालेली आहे. चौकशीअंती जे पुढे येईल त्या पद्धतीने कारवाई केली जाईल. या संदर्भातील कायदा आहे आणि तो सबंध देशात आहे. जात बघून एखाद्याला कमी लेखलं आणि अशा गोष्टी नाकारल्या, तर त्यासाठी कायदा आहे. कायद्याप्रमाणेच पुढील कारवाही होईल, असे मुंडे यांनी सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in