
Latur : देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Devni APMC Result News) निवडणुकीत १८ पैकी १६ जागेवर भाजपाने विजय मिळवला. विशेष म्हणजे देवणी बाजार समितीची ही पहिलीच निवडणूक होती. निलंगा विधानसभा मतदारसंघातील या समितीवर आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी पहिल्याच प्रयत्नात वर्चस्व मिळवले. विरोधकांना केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले.
देवणी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती झाल्यापासून संचालक मंडळांची काल झालेली ही पहिलीच निवडणूक होती. (Bjp) मतदारांनी बाजार समिती संचालक मंडळासाठी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क उत्साहाने बजावला. (Sambhajipatil Nilangekar) ही निवडणूक कॉग्रेस व राष्ट्रवादी यांनी आघाडी करुन एकत्र लढवली होती. तर आघाडी विरुद्ध भाजप अशा थेट झालेल्या लढतीत भाजपने बाजी मारली.
भाजपचे संदीपान प्रल्हाद पेटे, उमाकांत किशन बर्गे, सदाशिवराव रामचंद्र पाटील, सोपान दिलीप शिरसे, श्रीधर नर्सिंग पाटील, विलास बाबुराव कदम. (Latur) संगाप्पा प्रल्हाद चरपले, बस्वराज गरबस पाटील, माधव मोहन बालुरे, राजकुमार धोंडीराम बिरादार, दिलीप शंकरप्पा मेजगे, सुकुमार नामदेव भोसले, कमलबाई नागनाथ रामासने, शिवाजी बाबुराव पडिले, शिवानंद श्रीमंत मिर्झापुरे हे सोळा उमेदवार विजयी झाले.
तर महाविकास आघाडीचे मनोज माणिकराव लांडगे, अमिरसाब शरीफ शेख हे विजयी झाले. निकालानंतर भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी गुलाल उधळत फटाक्यांची आतिषबाजी केली. मात्र निलंगा विधानसभा मतदार संघातील निलंगा, शिरूरअनंतपाळ देवणी या तिन्ही बाजार समित्या भाजपच्या ताब्यात आल्याने काँग्रेसला मोठा झटका बसल्याचे पहायला मिळाले.
निलंगा मतदारसंघातील तीनही बाजार समित्यांवर भाजपचा झेंडा फडकल्याने आमदार निलंगेकर यांची ताकद वाढली आहे. आगामी जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत याचा फायदा भाजप व स्वतः निलंगेकर यांना देखील होणार आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.