‘मला मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते...’ फडणवीसांच्या या विधानावर पंकजा म्हणाल्या...

जनतेचे एवढं प्रेम मिळत असेल, तर तीही चांगली गोष्ट आहे.
‘मला मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते...’ फडणवीसांच्या या विधानावर पंकजा म्हणाल्या...
Devendra Fadnavis-Pankaja Munde Sarkarnama

औरंगाबाद : मला आजही मुख्यमंत्री असल्याचे वाटते, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईतील एका कार्यक्रमात वक्तव्य केले होते. त्यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. फडणवीस यांच्या त्या वक्तव्यावर आता भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, चांगली गोष्टी आहे. मला तर आनंद आहे. (Devendra Fadnavis's statement about Chief Minister, Pankaja Munde said...)

भारतीय जनता पक्षाच्या वतीने औरंगाबाद येथे ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांनी त्यांना फडणवीस यांनी आजही मला मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते, असे विधान केले आहे, त्यावर आपल्याला काय वाटते, असा प्रश्न विचारला होता. त्यावर त्या म्हणाल्या की, चांगली गोष्टी आहे. मला तर आनंद आहे. एखाद्या व्यक्तीला जर असं वाटतं असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे. जनतेचे एवढं प्रेम मिळत असेल, तर तीही चांगली गोष्ट आहे. आजही मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे, असे ते म्हणतात, यावर हसत पंकजा म्हणाल्या की, जनतेच्या मनातील हा शब्द तुम्ही खेचू शकत नाही, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.

Devendra Fadnavis-Pankaja Munde
हर्षवर्धन पाटलांनी बाजी मारली; कर्मयोगी कारखान्याची निवडणूक बिनविरोध !

भाजपचे सरकार असताना पंकजा मुंडे यांनी मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे, असे विधान केले होते. त्याचा संदर्भ आज पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पंकजा यांचा होता.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

कोणत्या पदावर आहे, हे महत्त्वाचे नाही. गेली दोन वर्षे एक दिवसही घरी न थांबता मी जनतेत मिसळतो आहे, सामान्य जनतेची कामे करतो आहे. आमची लोकोपयोगी कामे सुरूच आहेत, त्यामुळे मी आजही मुख्यमंत्री असल्याचे मला वाटते,’ असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईतील बेलापूर येथे बोलताना केले.

Devendra Fadnavis-Pankaja Munde
भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने मोदींना पुन्हा एकदा जाहीरपणे आणलं अडचणीत

लोकोपयोगी उपक्रम सातत्याने हाती घेण्याचे काम आमदार मंदा म्हात्रे करत असतात. आपल्या घरातील आई व सून ही घराची काळजी घेत असते. पुरुष ज्या गोष्टींचा विचार करत नाहीत, तो विचार घरातील महिला करीत असते. एक ऊर्जावान स्त्री लोकप्रतिनिधी होते, त्यावेळी ती आपल्या मतदारसंघाची तसेच शहराची काळजी घेत असते. ते आम्हाला मंदा म्हात्रे यांच्यामध्ये पहायला मिळते. सातत्याने कुटुंबप्रमुखासारखी त्या मतदारसंघाची तसेच या शहराची काळजी घेत असतात, अशा शब्दांत फडणवीस यांनी आमदार म्हात्रे यांच्या कामाचे कौतुक केले.

Related Stories

No stories found.