अशोक चव्हाणांचे मेहुणे खतगावकरांची खेळीच देगलूरचा आमदार ठरवणार

देवेंद्र फडणवीस आणि भास्करराव पाटील खतगावकर यांच्यात बंद खोलीत अर्धातास चर्चा झाली.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissarkarnama

नांदेड : अतिवृष्टी पाहणीनिमित्ताने नांदेड दौऱ्यावर आलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमिवर ज्येष्ठ नेते माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर (Bhaskarrao Patil) यांच्या राजेंद्रनगर नांदेड येथील निवासस्थानी आज (ता. ३ ऑक्टोबर) सकाळी जाऊन भेट घेतली. विधानसभेच्या पोटनिवडणुकीमुळे या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. (Devendra Fadnavis met Bhaskarrao Patil Khatgaonkar)

या भेटीत देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसंबंधी फडणवीस व भास्करराव पाटील खतगावकर यांच्यात बंद खोलीत अर्धातास चर्चा झाली. फडणवीस व भास्करराव पाटील खतगावकर यांची नांदेड दौऱ्यात भेट होऊ नये म्हणुन अनेकांनी प्रयत्न केले. मात्र, फडणवीस यांनी खतगावकरांची भेट घेतल्यामुळे विरोधकांचे मनसुबे उधळल्याचे बोलले जाते. खतगावकरांची भेट घेतल्यामुळे कार्यकर्त्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

बिलोली-देगलूर विधानसभा मतदारसंघाचे आजपर्यंत माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी या भागाचे तीन वेळा आमदार व तीन वेळा खासदार म्हणुन नेतृत्व केले आहे. खतगावकर हे ज्या उमेदवाराच्या पाठीमागे आपली ताकत उभी करतील तोच उमेदवार निवडून येतो. खतगावकरांचा दांडगा जनसंपर्क व कार्यकर्त्यांची मोठी फळी या मतदारसंघात असल्यामुळे फडणवीस यांनी खतगावकरांची भेट घेवुन पंढरपुरची पुनरावृत्ती देगलूर-बिलोली मतदारसंघात कशी होईल याची चर्चा केल्याचे समजते.

या वेळी फडणवीस यांचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर व जिल्हा परिषदसदस्या डॉ. मीनल पाटील खतगावकर यांनी शाल व पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, लातूरचे खासदार सुधाकर श्रृंगारे, आमदार राजेश पवार, माजी मंत्री, मराठवाडा संघटन मंत्री भाउराव देशमुख, डॉ. माधवराव किन्हाळकर, महानगराध्यक्ष प्रवीण साले, चैतन्य देशमुख, डॉ. अजित गोपछडे, संजय कौडगे, संतुकराव हंबर्डे, प्रवीण पाटील चिखलीकर, दिपक पावडे, माधवअण्णा साठे, संदीप क-हाळे आदी, उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com