मायबाप सरकारनं काही तरी करावं ; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांना रडू कोसळलं

शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून फडणवीस (Devendra Fadnavis) यांना सुद्धा गहिवरून आलं.
मायबाप सरकारनं काही तरी करावं ; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांना रडू कोसळलं
Devendra Fadnavissarkarnama

नांदेड : विरोधीपक्षनेते सध्या नांदेड जिल्ह्याच्या दैाऱ्यावर आहेत. फडणवीसांनी यावेळी फुलवळ येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. अतिवृष्टी भागाचा दौरा करताना देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर कैफियत मांडताना शेतकऱ्यांच्या अश्रुंचा बांध फुटला. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून फडणवीस (Devendra Fadnavis) यांना सुद्धा गहिवरून आलं.

नांदेड जिल्ह्यातील फुलवळ येथील पिकांची पाहताना फडणवीसांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी फडणीस यांनी सरकारकडून मदत मिळवून देण्या बाबतचा धीर देत असताना एवढा पाऊस झाला की शेकडो हेक्टर खरडून गेली. पिकांसह शेतातील माती ही वाहून गेली गळ्यापर्यंत एवढे खड्डे पडले. रखडलेली जमिन दुरुस्तीसाठी ही काही तरी सरकारनं करावं, अस म्हणत शेतकऱ्याच्या भावना अनावर झाल्या. आपली व्यथा मांडत असताना शेतकऱ्यांना रडू कोसळले.

Devendra Fadnavis
शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या मंत्र्यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल

सरकारने (State Government) कुठलीही चालढकल न करता अतिवृष्टीत (Heavy Rain) नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना (Farmer)सरसकट मदत जाहीर करावी, शेतऱ्यांना मदत मिळेपर्यंत सरकारला झोप लागू देणार नाही, असा इशारा माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल जळकोट (जि. लातूर) येथे दिला.

फडणवीस व विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) मराठवाडा दौऱ्यावर आहेत. रविवारी (ता. ३) त्यांनी नांदेड जिल्ह्यातील नायगाव व बिलोली तालुक्याताल काही गावांतील नुकसानग्रस्त शेतीची पहाणी केली. त्यानंतर लातूर जिल्ह्यात जावून त्यांनी वांजरवाडा (ता. जळकोट) येथील शेतकऱ्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते.

यानेळी खासदार सुधाकर श्रृंगारे, आमदार संभाजी पाटील- निलंगेकर, आमदार रमेश कराड, आमदार अभिमन्यू पवार, माजी आमदार सुधाकर भालेराव, माजी खासदार सुनील गायकवाड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, तालुकाध्यक्ष अरविंद नागरगोजे, सरपंच अविनाश नळंदवार आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.