Devendra Fadnavis : 'ही' गोष्ट केली नाही तर थेट मुख्यमंत्री होता येतं ; फडणवीसांचा सल्ला!

Devendra Fadnavis : हा वसा ज्योतीताई पुढे नेत आहेत.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama

Devendra Fadnavis : शिवसंग्राम संघटनेचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या व्यसनमुक्ती कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित लावली. यावेळी भाषणादरम्यान त्यांनी एक विधान केले. व्यसन नाही केलं तर माणूस मुख्यमंत्री बनतो,असे फडणवीस म्हणाले. हे वक्तव्य केवळ व्यसनमुक्ती संबंधित होतं की, आपल्या प्रतिस्पर्धी, विरोधक यांना लागवलेला टोला होता, यावर चर्चा होताना दिसत आहे. ते आज बीड जिल्ह्यात बोलत होते.

Devendra Fadnavis
Jorgewar : आमदार जोरगेवारांच्या मागणीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल, दिला ‘हा’ शब्द !

नव्या वर्षाचे स्वागत करताना, तळीरामांकडून पार्ट्या केल्या जातात. वेगवेगळ्या पद्धतीचे व्यसनं, नशा केले जातात. अशावेळी याच काळात तरूणांनी व्यसनापासून दूर राहावे, यासाठी दिवंगत विनायक मेटे यांनी व्यसनमुक्तीसाठी पुढाकार घेऊन, असे कार्यक्रम घेण्यास सुरूवात केली. आता त्यांच्यानंतर ज्योती मेटे यांनी हा उपक्रम सुरूच ठेवला आहे, असेही फडणवीस म्हणाले. याप्रसंगी बोलताना फडणवीसांना गोपीनाथ मुंडे यांचेही स्मरण झाले. मुंडेना नमन करत, त्यांना स्वर्गीय विनायक मेटे यांना आदरांजली वाहिली होती.

Devendra Fadnavis
BJP News : चर्चा तर होणारच! ; फडणवीसांच्या कार्यक्रमाला मुंडे भगिनींची दांडी

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, चरस, गांजाच्या व्यसन केले जाते. दारू नाही, तर मसाला दूध घेतले पाहिजे, ही संकल्पना दिवंगत मेटे यांची होती.आज जेव्हा मी कार्यक्रमाला येत आहे, तेव्हा दुर्दैवाने मेटे साहेब आपल्यात नाहीत, ज्योतीताईंनी मला निमंत्रण दिले, हा वसा ज्योतीताई पुढे नेत आहेत, म्हणून या कार्यक्रमाला आज आलो. व्यसन जर नाही केलं, तर माणूस मुख्यमंत्री बनतो, असे फडणवीस यांनी म्हंटले. मेटे यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण ताकतीने शिवसंग्राम च्या मागे आहोत, असेही फडणवीस म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in