Devendra Fadnavis : ''आपल्या मनात काहीही असलं तरी ईश्वराच्या मनात असेल तेच घडतं..''

Devendra Fadnavis News : नाथांसह गोपीनाथांच्या आशीर्वादावरच वाटचाल सुरु....
Devendra Fadnavis Latest News
Devendra Fadnavis Latest NewsSarkarnama

दत्ता देशमुख

Devendra Fadnavis News : गहिनीनाथ गडावर यावं यासाठी गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराजांनी मला निमंत्रण दिले, तेव्हा १५ तारखेला दावोसच्या आंतरराष्ट्रीय परिषदेला जायचं निश्चित होतं. तसं मी महाराजांना सांगितलं. पण, ईश्वराच्या मनात असेल तेच घडतं. आजच आपलं दर्शन घडावं असं संत वामनभाऊंची इच्छा असल्यानं मुख्यमंत्री देवासच्या परिषदेला गेले व आपण इथे आलो असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील श्रीक्षेत्र गहिनीनाथगड येथे संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) गडावर आले. नाथांसह गोपीनाथांचाही आशीर्वाद मिळाला. या आशीर्वादावरच वाटचाल सुरु असल्याचंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis Latest News
Chanda Kochhar : सीबीआयची 'ही' मागणी न्यायालयाकडून मान्य; कोचर यांना जन्मठेप होणार?

फडणवीस म्हणाले, मुंबईहून हेलिकॉप्टरनं या ठिकाणी कार्यक्रमाला आलो. मात्र, येताना हेलिकॉप्टरमधून मुंबईचा महासागर तर इथे आल्यानंतर भक्तांचा महासागर पाहायला मिळाला. आपल्या मनात काहीही असलं तरी ईश्वराच्या मनात असेल तेच घडतं. आज दर्शन घ्यावं ही वामनभाऊंची इच्छा होती.

खऱ्या अर्थानं देश, देव, धर्म हा वारकरी परंपरेमुळे वाचला. संत ज्ञानेश्वर माऊलीं, संत तुकाराम महाराजांपासून वारकरी परंपरा आहे. सातत्यानं आक्रमणं होत असताना, अंध:कार पडलेला असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय झाला असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Devendra Fadnavis Latest News
Urfi Javed-Chitra Wagh Controversy : उर्फी जावेदने पोलिसांकडे दिलेल्या जबाबात या गोष्टीचा केलाय स्पष्ट उल्लेख !

संत वामनभाऊंचे समाधी मंदीर असलेल्या पाटोदा तालुक्यातील श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडही अनेक वर्षांपासून राजकीय नेत्यांचे श्रद्धास्थान झाला. पालकमंत्री असताना पंकजा मुंडे हमखास येथे पुण्यतिथीला येत असत. त्यांच्यासोबत भगिनी खासदार डॉ. प्रीतम मुंडेही असत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे हे देखील नेहमी गडावर जातात. यावेळी मात्र उपचार सुरु असल्यानं त्यांना येता आलं नाही.

यावेळी गडाच्या मठाधिपतींनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पुण्यतिथी सोहळ्याला बोलवलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले. परंतु, हमखास येणाऱ्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व त्यांच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे यांची अनुपस्थित राहिल्या. दरम्यान, उपमुख्यमंत्री आलेले असताना भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in