संजय राऊतांना मी उत्तर देणार नाही! फडणवीसांचा रोखठोक जबाब

फडणवीस यांनी लगेचच देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पक्षीय राजकारण साधले.
संजय राऊतांना मी उत्तर देणार नाही! फडणवीसांचा रोखठोक जबाब
Devendra Fadnavis sarkarnama

नांदेड : गुलाब चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यामध्ये लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झाले. त्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी रविवारी नांदेडमधील चिवली आणि फुलवाल गावांना भेट दिली. अतिवृष्टी आणि पूर अशी स्थिती महाराष्ट्रात आहे. सत्य परिस्थिती सरकारला समजावी तेथे त्या गोष्टींची पूर्तता व्हावी, यासाठी हा दौरा काढण्यात आला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या वेळी त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना टोला लगावला.

 Devendra Fadnavis
पुंडलिका भेटी परब्रह्म आले : पवारांच्या भेटीनंतर नीलेश लंकेची भावनिक पोस्ट

संकटग्रस्त लोक अशा प्रसंगी अश्रूंना बांध मोकळा करून देतात व विरोधक त्याच अश्रूंचे भांडवल करून सरकारला धारेवर धरण्याची संधी घेतात, असा टोला शिवसेनेने सामनामधून विरोधी पक्षाच्या नेत्यांना लगावला आहे. त्यावर बोलताना फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. जे ऑफिसमध्ये बसून टीका आणि राजकारण करतात त्यांना शेतकऱ्यांची परिस्थिती समजूच शकत नाही. त्यांनी कधी शेतकऱ्यांना भेट दिली नाही, त्यांचे अश्रू पुसले नाही. त्यांनी येथे येऊन अश्रू पाहिले असते ना तर अशा प्रकारे बोलायची त्यांची हिंम्मत झाली नसती. अशा लोकांना का उत्तर द्यायचे? हे कागदावरचे नेते आहेत. ते अग्रलेख लिहून नेते झालेले लोक आहेत. त्यामुळे त्यांना काही मी उत्तर देत नाही, असे फडणवीस यांनी म्हटले.

 Devendra Fadnavis
एकनाथ खडसे अडचणीत; आता महिला आयोगाच्या कारवाई करण्याच्या सूचना

सामनामध्ये म्हटले होते की, विरोधी पक्ष हे बौद्धिक बेइमानी करीत आहेत. राजकीय फसवेगिरीतही ते आघाडीवर असल्याचे ज्वलंत मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले. विरोधकांनी लोकांना फसवू नये व गोंधळ निर्माण करू नये, असा सल्ला त्यांनी दिला. त्याबरहुकूम राज्यातल्या विरोधी पक्षाने वागायचे ठरवले असेल तर त्यात त्यांचे व राज्याचेही हित आहे.

कारण मराठवाडयातील पूरस्थितीविषयी एक संयमी भूमिका मांडणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पक्षीय राजकारण साधले. म्हणजे पूरग्रस्तांचे सांत्वन हा एक 'मुखवटा' होता. त्याआड दडलेले राजकारण हा 'चेहरा' होता का? असा सवाल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.