"फक्त टोमणे" : उद्धव ठाकरेंच्या एका तासाच्या भाषणाला फडणवीसांचे दोन ट्वीटमधून उत्तर
Devendra Fadnavis-Uddhav ThackeraySarkarnama

"फक्त टोमणे" : उद्धव ठाकरेंच्या एका तासाच्या भाषणाला फडणवीसांचे दोन ट्वीटमधून उत्तर

Uddhav Thackeray | Devendra Fadnavis : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा

औरंगाबाद : औरंगाबादच्या ऐतिहासिक मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेनेच्या मराठवाड्यातील पहिल्या शाखेच्या वर्धापनदिनानिम्मित सभा पार पडली. या सभेत बोलताना त्यांनी भाजप (BJP) आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर चौफेर टिका केली. सोबतच संभाजीनगर, हिंदुत्व, औरंगाबादचा पाणी प्रश्न, रस्ते अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले. उद्धव ठाकरे यांचे हे भाषण जवळपास १ तासाचे झाले. (Uddhav Thackeray | Shivsena | Aurangabad | Latest News)

मात्र उद्धव ठाकरे यांच्या या एका तासाच्या भाषणाला देवेंद्र फडणवीस यांनी केवळ २ ट्वीटमधून उत्तर दिले. ते म्हणाले, बांधावरची मदत ज्यांना स्मरत नाही, पेट्रोल-डिझेलचे दर जे स्वत: कमी करीत नाही, त्यांनी दुसर्‍यांना ‘अच्छे दिन’ सांगावे, म्हणजे लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि...! माझे पुन्हा सवाल आहेत, शेतकर्‍यांना मदत केव्हा करणार? पेट्रोल-डिझेलचे दर केव्हा कमी करणार?असो, संभाजीनगरचे नामकरण, पाण्याचा प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न, विकासाची एखादी नवीन योजना... काही तरी ठोस मिळेल, अशी उगाच त्यांची अपेक्षा होती. पण, संभाजीनगरवासियांना मिळाले काय तर पुन्हा एकदा टोमणे आणि फक्त टोमणे!, अशी उपहासात्मक टीका त्यांनी केली. (Uddhav Thackeray | Shivsena | Aurangabad | Latest News)

राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही उद्धव ठाकरे यांच्या सभेतील भाषणाचा समाचार घेतला. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांसाठीहिंदुत्व आणि सत्तांतर आता कालबाह्य विषय झाले आहेत. त्यामुळे नामांतरवर ते असं बोलत आहेत. जम्मू काश्मीर हा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा सोडवतील. तसेच हिंमत होती म्हणून कलमं ३७० हटवलं. मोदीच्या हिंमतीच कौतुक देश करतो. तुम्ही आधी मुंबई शहरात अस्वछता आहे ती घाण आधी साफ करा. (Uddhav Thackeray | Shivsena | Aurangabad | Latest News)

दरेकर पुढे म्हणाले, पाणी प्रश्न सोडवण्याआधी आधी तो समजून घ्यावे लागतो. त्यासाठी बैठका घ्याव्या लागतात. केंद्र सरकारची जल जीवन योजना राबवण्यात आली आहे, त्यातील जल जीवन निधी का वापरला नाही याचा उत्तर द्यावे मग पाण्यावर बोला. हे केंद्राने दिलेला निधी वापरू शकले आणि आता जलजीवन बद्दल बोलू लागले आहेत, अशी टीकाही दरेकर यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in