Beed Election : आमदार सोळंकेंनी सत्तेतून चौकशा लावल्या; जोर लावला तरी आडसकरांनीच निवडणूक जिंकली

आगामी नगर पालिका व जिल्हा परिषद - पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीच्या निवडणुकीला मोठे महत्व प्राप्त झाले होते.
Beed Election
Beed Election

Beed Election news : राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी प्रतिष्ठा व ताकद लावल्याने धारुर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक अटीतटीची वाटली. मात्र, निकालात भाजपचे माजलगाव मतदार संघाचे नेते रमेशराव आडसकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपने (BJP) एकहाती विजय मिळविला. गुरुवारी (ता. १५) मतदानानंतर शुक्रवारी (ता. १६) सकाळी मतमोजणीनंतर निकाल जाहीर झाला. राष्ट्रवादीला १८ पैकी केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.

Beed Election
Crime News : गस्त घालणार्या पोलिसांच्या गाडीवरच दगडफेक; पुण्यातील धक्कादायक प्रकार

रविवारीच (ता. १८) होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार ओपनिंग केली आहे. आगामी नगर पालिका व जिल्हा परिषद - पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीच्या निवडणुकीला मोठे महत्व प्राप्त झाले होते. माजलगाव मतदार संघातील तीन तालुक्यांपैकी धारुर तालुका राजकीयदृष्ट्या महत्वाचा आहे. या बाजार समितीवर अनेक वर्षांपासून आडसकरांचे वर्चस्व आहे. दिवंगत लोकनेते बाबूराव आडसकर यांच्यानंतर रमेशराव आडसकर यांनी धारुर कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता हाती ठेवली. दरम्यान, मागच्या विधानसभा निवडणुकत रमेशराव आडसकर यांनी माजलगाव मतदार संघातून भाजपकडून राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके यांच्या विरोधात निवडणुक लढविली.

शेवटच्या टप्प्यात मैदानात उतरुनही आडसकरांनी काट्याची लढत दिली. परंतु, सोळंकेंचा विजय आणि महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर सोळंकेंनी बाजार समितीबाबत सहकार व पणन विभागाकडे अनेक तक्रारी केल्या. यावरुन बाजार समितीच्या चौकशाही लागल्या. या निवडणुकीत देखील प्रकाश सोळंके यांनी ताकद व प्रतिष्ठा पणाला लावली. रमेशराव आडसकर हे राजाभाऊ मुंडे यांच्या साथीने मैदानात उतरले.

१८ जागांसाठीच्या निवडणुकीत सेवा सहकारी सोसायटी गटात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वेळीच आडसकर एक समर्थक बिनविरोध विजयी झाला. त्यानंतर उर्वरित १७ जागांसाठी निवडणुक झाली व गुरुवारी मतदान होऊन शुक्रवारी सकाळी मतमोजणी झाली. यात भाजपने एकहाती १६ जागांवर विजय मिळविला. मागच्या वेळी आठ संचालक असलेल्या राष्ट्रवादीला यावेळी केवळ एक जागा जिंकता आली. विशेष म्हणजे ग्रामपंचायत मतदार संघातील जागा मोठ्या फरकाने विजयी झाल्या. आता रविवारीच ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी भाजपला या निकालामुळे वातावरण निर्मितीसाठी फायदा झाला आहे. तर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही भाजपसाठी हा निकाल महत्वाचा मानला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com