Jyoti Mete : डॉ. मेटेंचा निर्धार; फडवीसांचे बळ अन् संग्रामींना हुरुप...

Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर आश्वासनामुळे शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांना बळ मिळाले.
Jyoti Mete
Jyoti Mete Sarkarnama

Jyoti Mete : दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे (Vinayak Mete) यांनी उभी हयात सामाजिक चळवळीत घालविली. त्यांचे अकाली अपघाती निधन देखील मराठा समाजाच्या आरक्षण बैठकीला जातानाच झाले. त्यांच्या अपरोक्ष राज्यभर लावलेल्या व त्यांनी जिव आणि रक्त ओतून वाढविलेल्या शिवसंग्रामला छत्रछाया कोणाची, असा प्रश्न होता. मात्र, डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांनी व्यक्त केलेला निर्धार आणि त्यांच्या निर्धाराला बळ देण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे जाहीर आश्वासन यामुळे कार्यकर्त्यांना हत्तीचे बळ आले आहे.

सामाजिक चळवळीच्या माध्यमातून पुढे आलेल्या विनायकराव मेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही काम केले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि आरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारावे, या महत्वाच्या प्रश्नांसोबतच त्यांनी सामुदायिक विवाह सोहळा, धनगर समाजाचे आरक्षण, मुस्लिम समाजाला आरक्षण, स्पर्धा परीक्षा व पोलिस भरतीमध्ये तरुणांची वयोमर्यादा शिथिलता, ईडब्ल्यूएस व इतर योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कायम पुढाकार घेतला.

शेतकऱ्यांना निवृत्तीवेतन व सुशिक्षीत बेरोजगार तरुणांना भत्ता मिळावा, अशीही त्यांची कायम मागणी असेल. आपल्या मागण्यांसाठी दिवंगत विनायकराव मेटे यांनी कायम विधिमंडळ अधिवेशनांत लक्षवेधी, तारांकित प्रश्नांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व संबंधीत मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यासह रस्त्यावरच्या लढायाही लढल्या.

Jyoti Mete
Sangram Thopte : काँग्रेस आमदार थोपटे फडणवीसांना भेटले आणि आता केला 'हा' खुलासा...

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशावेळी त्यांनी त्यांची तत्कालिन महाराष्ट्र लोकविकास पार्टी राष्ट्रवादीत विलीन केली होती. पुढे, त्यांनी शिवसंग्राम संघटनेची स्थापना केली. संघटनेच्या माध्यमातून त्यांनी भव्य मराठा आरक्षण मेळावेही घेतले. या संघटनेचा राज्यभर विस्तार आणि संघटनेचे अनेक पदाधिकाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेवर प्रतिनित्वही केले. मागच्या विधानसभेत संघटनेच्या तिघांना भाजपने स्वत:च्या चिन्हाच्या उमेदवाऱ्या दिल्या. तिघांना विजयी करण्यात दिवंगत विनायकराव मेटे यांना यश मिळाले.

दरम्यान, १४ ऑगस्टला पहाटे मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बोलविलेल्या बैठकीला जाताना त्यांचे दुर्दैवी निधन झाले. राज्यभरातील त्यांचा शिवसंग्राम परिवार पोरका आणि हवालदिल झाला. मेटे कुटूंबियांसाठी तर आभाळच फाटले. मात्र, आपल्यावर आकांक्षा व आशुतोष या दोन मुलांसह मेटे कुटूंबिय राज्यातील पोरक्या झालेल्या शिवसंग्राम परिवाराची आणि पतीने उभारलेली सामाजिक चळवळ पुढे न्यायची जबाबदारी आपल्या खांद्यावर असल्याची जाण डॉ. ज्योती मेटे यांना असल्याचे त्यांनी सुरुवातीपासूनच दाखवून दिले.

Jyoti Mete
Pune Municipal Corporation : पुणेकरांनी दाखवला महापालिकेला हिसका; १६ लाखांचे पाठवले बिल

स्वत: उच्चपदस्थ अधिकारी असलेल्या डॉ. ज्योती मेटे राजकीय परिघापासूनच दुरच असत. दिवंगत मेटेंच्या राजकीय व सामाजिक चळवळीत पडद्याआडून भूमिका करत. प्रामाणिक अधिकारी अशीच त्यांची सहकार खात्यात ओळख आहे. आता त्यांनी आपले दु:ख बाजूला ठेवत शिवसंग्राम परिवारातील लोकांच्या दु:खद प्रसंगात सहभागाला सुरुवात केली.

तेव्हापासून कार्यकर्त्यांनाही आपल्या पाठीशी कोणीतरी असण्याची भावना निर्माण झाली. त्यांनी दिवाळीत आपल्या वेतन रकमेतून परिसरातील एक हजारांहून अधिक लोकांना दिवाळी फराळ वाटप केला आणि मागच्या आठवड्यात दिवंगत मेटे यांनी उभारलेली व्यसनमुक्तीची चळवळ पुढे नेण्यासाठी जनजागृती फेरी व उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या कार्यक्रम देखील स्वखर्चातून आणि देखण्या पद्धतीने पार पाडला.

Jyoti Mete
Sudhir Mungantiwar :..तर संजय राऊत खासदारकीचा राजीनामा देणार का?; सुधीर मुनगंटीवारांचं खुलं आव्हान

विशेष म्हणजे, त्यापूर्वीच त्यांनी 'योग्य वेळी चौकटीत राहून योग्य भूमिका' घेऊ असे सुचक विधान केलेच होते. पण, त्यांनी व्यसनमुक्ती जनजागृती फेरीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देणे आणि फडणवीसांनीही निमंत्रण स्विकारुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांच्यासह हजेरी लावण्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दुणावला.

याच कार्यक्रमात डॉ. ज्योती मेटे यांनी 'दिवंगत विनायक मेटे यांनी उभारलेली चळवळ आणि सुरु केलेले सामाजिक काम निर्धाराने पुढे नेणार,' असा व्यक्त केलेला निर्धार व त्यांच्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही डॉ. ज्योती मेटे यांनी हाती घेतलेल्या कामाला बळ देणार असे सांगीतल्याने शिवसंग्राम पदाधिकाऱ्यांमध्ये आजही आपल्याला खंबीर आधार असल्याची भावना निर्माण झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in