संभाजीराजे छत्रपतींचा जाणीवपूर्वक अपमान? मराठा संघटना आक्रमक

Sambhajiraje Chhatrapati Latest news| छत्रपती घराण्यातील कोणतीही व्यक्तीला तुळजाभवानी मातेच्या थेट गाभाऱ्यात जाऊन विधिवत मातेचे दर्शन घेता येते, ही शेकडो वर्षांची परंपरा आहे.
संभाजीराजे छत्रपतींचा जाणीवपूर्वक अपमान? मराठा संघटना आक्रमक
Sambhajiraje Chhatrapati

Sambhaji Raje Chhatrapati latest news

उस्मानाबाद : तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरातील गाभाऱ्यात जाण्यापासून संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांना अडवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मराठा क्रांती मोर्चाने हा आरोप केला असून उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. संभाजीराजे सोमवारी रात्री 9 वाजता देवीच्या दर्शनासाठी गेले होते. मात्र त्यांना गाभाऱ्यात जाण्यापासून अडवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी आणि मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी, मंदीरात ज्या पूजाऱ्याची पाळी आहे त्याने वगळता इतर कोणालाही मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यास बंदी केली होती. या नियमाच्या आधारे संभाजी महाराजांना अडवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Sambhajiraje Chhatrapati
‘शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकीसाठी कामाला लागावे’

नेमकं काय घडलं?

तुळजाभवानी माता ही छत्रपती घराण्याची कुलस्वामिनी आहे. छत्रपती घराण्यातील कोणतीही व्यक्ती जेव्हा तुळजाभवानी मातेच्या दर्शनास जाते तेव्हा त्यांना थेट गाभाऱ्यात जाऊन विधिवत मातेचे दर्शन घेता येते, ही शेकडो वर्षांची परंपरा आहे. सोमवारी रात्री 9 वाजता युवराज संभाजीराजे छत्रपती दर्शनासाठी तूळजाभवानी मंदीरात गेले होते. मात्र यावेळी मातेच्या गाभाऱ्यात जाण्यापासून त्यांना रोखण्यात आले.

सरकारी नियमांच्या आधारे संभाजीराजे यांना मंदिरातील गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आले. यावेळी संभाजीराजेंनी आपल्या घराण्याची परंपरा आपल्याला पाळू द्या, अशी विनंती करून देखील त्यांना आतमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. मंदिरातील कंत्राटी पध्दतीने कामावर असलेल्या आणि मंदिर प्रशासनातील कर्मचाऱ्यांना संभाजीराजेंशी गैरवर्तन केल्याचा आरोप मराठा समाजाने केला आहे. या प्रकरणी संबंधित मंदिर व्यवस्थापक आणि धार्मिक व्यवस्थापक, तहसीलदार, जनसंपर्क अधिकारी यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली असून तसे न झाल्यास राज्यभर जनआंदोलन उभारू, असा इशाराही देण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.