शिवाजी महाराजांचे तैल चित्र हटवून आघाडीच्या नेत्यांचे फोटो ; माजी सभापती भडकले

ज्यांच्या नावाने राजकारण हे पक्ष करतात त्याच शिवाजी महाराजांचे चित्र काढण्याचे कृत्य या संचालक मंडळाने केले आहे. (Aurangabad Market committee)
Market Committee
Market CommitteeSarkarnama

औरंगाबाद ः छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) नावाने चालणाऱ्या औरंगाबाद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत एक नवा वाद सुरू झाला आहे. मध्यंतरी झालेल्या राजकीय घडामोडीनंतर भाजपच्या (Bjp) ताब्यात असलेली ही बाजार समिती महाविकास आघाडीच्या ताब्यात गेली आहे. (Marathwada) तेव्हापासून इथे भाजप विरुद्ध शिवसेना, काॅंग्रेस, राष्ट्रवादी असा संघर्ष झडत असतो.

आता तर भाजपचे माजी सभापती राधाकिशन पठाडे यांनी विद्यमान मुख्य प्रशासक व इतरांवर दालनात लावण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र हटवून तिथे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटो लावल्याचा आरोप केला आहे.

या प्रकारामुळे शेतकरी, मराठा समाज व नागरिकांच्या भावना दुखावल्या असून तातडीने शिवाजी महाराजांचे तैलचित्र पुन्हा दालनात लावावे, अशी मागणी माजी सभापती पठाडे यांनी सचिव विजय शिरसाट यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

बाजार समितीच्या नव्या संचालक मंडळाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे तैलचित्र काढून त्या जागी, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांचे फोटो लावले आहेत. ज्यांच्या नावाने राजकारण हे पक्ष करतात त्याच शिवाजी महाराजांचे चित्र काढण्याचे कृत्य या संचालक मंडळाने केले आहे. यामुळे तमाम समाज बांधवाच्या भावना दुखावल्या आहेत.

एवढेच नाही तर, बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरुवात करण्याची प्रथा गेल्या कित्येक वर्षांपासून रुढ आहे. मात्र शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या या तीन्ही पक्षाच्या संचालक मंडळाला याचा देखील विसर पडला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Market Committee
वोट बॅंकेवर डोळा ःऔरंगाबादेत राष्ट्रवादीकडून शहर-जिल्हाध्यक्षपदी मुस्लिम चेहरा

आमच्या संचालक मंडळाने शिवाजी महाराज्या नावाने चालणाऱ्या या बाजार समितीत भव्य असे शिवाजी महाराजांचे स्मारक उभारून त्यांच्या विचारचे पाईक होण्याचा प्रयत्न केला, असेही पठाडे यांनी म्हटले आहे. दरम्यान, मुख्य प्रशासक जगन्नाथ काळे यांनी मात्र पठाडे यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. माझ्या दालनात छत्रपती शिवाजी महाराजांची तसबीर समोर आहे. त्यांचे दर्शन घेऊनच आम्ही कामकाज करतो. तेव्हा भाजपने आम्हाला शिवाजी महाराज शिकवू नये, असेही काळे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com