देगलूर-बिलोलीत मतदानाचा उत्साह

दुपारी बारा वाजेपर्यंत 22 टक्के मतदान झाले.
Degalur-Biloli
Degalur-Bilolisarkarnama
Published on

देगलूर : देगलूर बिलोली विधानसभा पोट निवडणुकीसाठी शनिवार (ता 30) रोजी सकाळी 7 पासून शांततेत व उत्साहात मतदानाला सुरुवात झाली. दुपारी बारा वाजेपर्यंत 22 टक्के मतदान झाले.

Degalur-Biloli
Degalur-Bilolisarkarnama

शहरासह ग्रामीण भागातही मतदारांनी उत्साहात मतदानात सहभाग घेतला असून काही ठिकाणी मतदारांनी मी रांगा लावून मतदानात सहभाग घेतला आहे. दुपारपर्यंत शहर व परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडला नसून मतदान अगदी शांततेत सुरू असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गिरी यांनी सांगितले.

Subhash sabane
Subhash sabanesarkarnama

भाजपचे उमेदवार माजी आमदार सुभाष पिराजीराव साबणे यांनी देगलूर येथे सपत्नीक गंगुताई सुभाषराव साबने यांच्यासह मतदान केले.

Jitesh Antapurkar
Jitesh Antapurkarsarkarnama

काँग्रेसचे उमेदवार जितेश रावसाहेब अंतापूरकर यांनी आपल्या आई श्रीमती शितलताई रावसाहेब अंतापूरकर यांच्यासह अंतापूर येथे मतदान केले.

Uttamrao Ingole
Uttamrao Ingolesarkarnama

वंचित आघाडीचे उमेदवार डॉक्टर उत्तमराव इंगोले यांनीही देगलूर येथे सपत्नीक मतदान केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com