वंचित वाढवणार अशोक चव्हाणांचे टेन्शन

देगलूर पोटनिवडणुकीसाठी वंचितने उमेदवार जाहीर केल्याने याठिकाणी तिरंगी सामना रंगणार आहे.
वंचित वाढवणार अशोक चव्हाणांचे टेन्शन
Ashok Chavansarkarnama

नांदेड : देगलूर-बिलोली मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर (Raosaheb Antapurkar) यांचे कोरोनामुळे निधन झाले होते. त्यामुळे देगलुर-बिलोली विधावसभा मतदार संघाची पोटनिवडणूक ३० ऑक्टोबरला जाहीर करण्यात आली आहे. या ठिकाणी काँग्रेसने जितेश अंतापूरकर यांना (Jitesh Aantapurkar) उमेदवारी जाहीर केली आहे. तर दूसरीकडे भाजपने (BJP), शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना उनेदवारी दिली आहे. त्याच आता वंचीत बहुजन आघाडीने डॅा. उत्तम इंगोले यांना उमेदवारी जाहिर केली आहे. (Declared Vanchit Bahujan Aaghadi candidate for Deglur-Biloli by-election)

Ashok Chavan
देगलूर-बिलोली पोटनिवडणूक ३० ऑक्टोबरला मतदान, ३ नोव्हेंबरला मतमोजणी..

देगलूर पोटनिवडणुकीसाठी वंचितने उमेदवार जाहीर केल्याने याठिकाणी तिरंगी सामना रंगणार आहे. वंचित आघाडी ही काँग्रेस नेते आणि बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे टेन्शन वाढवणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी अशोक चव्हाण यांना नांदेडमध्ये वंचितच्या उमेदवारामुळेच मोठा फटका बसला होता. लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचाही सामना करावा लागला आहे. देगलूर-बिलोलीची निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. त्यातच वंचितने उमेदवार जाहीर केल्याने त्यांना अधिक सावधगिरी बाळगावी लागणार आहे.

Ashok Chavan
अशोक चव्हाणांचे मेहुणे खतगावकरांची खेळीच देगलूरचा आमदार ठरवणार

इंगोले यांच्या उमेदवारीची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचितच्या प्रभारी अध्यक्षा रेखा ठाकूर यांनी केली आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या रिक्त झालेल्या ८५ जागांमध्ये काँग्रेसच्या १३ जागा होत्या. मात्र, यावेळी १७ उमेदवार विजयी झाले आहेत. देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळेल, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.