भाजपच्या प्रस्तावावर आठवडाभरात निर्णय ; महावितरण कार्यालयावरील मोर्चा रद्द

(BJP MLA Prashant Bamb had submitted a proposal to MSEDCL.) एकाही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कट केले जाणार नाही. शिवाय डीपी, रोहित्रांचा विद्युत पुरवठा देखील कायम राहील, याची हमी देखील महावितरणने दिली आहे.
भाजपच्या प्रस्तावावर आठवडाभरात निर्णय ; महावितरण कार्यालयावरील मोर्चा रद्द
Bjp Mla Prashant BambSarkarnaa

औरंगाबाद ः शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन, डीपी, रोहित्रांचा विद्युत पुरवठा खंडित केल्या जात असल्याने पीकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे वीज बीलांची सक्तीची वसुली नकरता कृषी पंपाच्या हाॅर्सपाॅवर प्रमाणे १ ते १० हजार रुपये भरून घ्यावेत, असा प्रस्ताव भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी महावितरणला दिला होता. तो मान्य न केल्यास उद्या (२२) रोजी औरंगाबाद येथील मिलकाॅर्नरच्या महावितरण कंपनीच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार होता.

परंतु बंब व शेतकऱ्यांनी दिलेल्या प्रस्तावावर आठवडाभरात निर्णय घेऊ, तोपर्यंत एकाही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन तोडले जाणार नाही, शिवाय डीपी, रोहित्रांचा विद्युत पुरवठा देखील खंडीत करणार नाही, असे आश्वासन महावितरणच्या वतीने आमदार बंब यांना देण्यात आले आहे. त्यामुळे उद्याचा महावितरण कार्यालयावरील मोर्चा तुर्तास स्थगित करण्यात आला आहे. आमदार प्रशांत बंब यांनीच ही माहिती सोशल मिडियाच्या माध्यमातून दिली.

जिल्ह्यात सर्वत्र महावितरणकडून शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट केले जात आहे. आतिवृष्टी, पूरामुळे आधीच अडचणीत सापडलेला शेतकरी महावितरणच्या या सक्तीच्या वसुलीने मेटाकुटीला आला आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजची रक्कम अद्याप हातात पडलेली नाही. शेतातील पिकांना पाणी द्यायचे तर महावितरणकडून वीज कट केली जात आहे.

यावर भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी महावितरणला एक प्रस्ताव दिला होता. त्यानूसार ज्या शेतकऱ्यांकडे १ ते १० एचपीचे कृषीपंप आहे, त्यांनी त्यानूसार एक ते दहा हजार रुपये वीज बीलापोटी भरावेत, महावितरणने देखील ते भरून घ्यावेत, जेणेकरून काही प्रमाणात वसुली होईल आणि शेतकऱ्यांना देखील आपल्या पीकांना पाणी देता येईल. पुढे पीक चांगली आली की शेतकरी उर्वरित वीज बील देखील भरतील.

Bjp Mla Prashant Bamb
पंकजा मुंडे, विनोद तावडे यांना संधी मिळेल, वर्षभरात स्कोप आहे

पंरतु या प्रस्तावावर महावितरण सकारात्मक नसल्यामुळे उद्या, व्यवसस्थापकीय संचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार होता. गंगापूर-खुल्ताबाद मतदारसंघासह जिल्हाभरातून शेतकरी मोठ्या प्रमाणात या मोर्चात सहभागी होणार होते. परंतु मोर्चाच्या पुर्वसंध्येला महावितरण कंपनीने आमदार प्रशांत बंब यांना आपण त्यांच्या प्रस्तावावर विचार करत असल्याचे कळवले.

शिवाय आपण देखील शेतकऱ्यांशी चर्चा करून अधिकची रक्कम भरणे शक्य होईल का? हे पहावे, आठवडाभरात एकत्रितपणे निर्णय घेऊ, असे सांगितले आहे. तोपर्यंत एकाही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कट केले जाणार नाही. शिवाय डीपी, रोहित्रांचा विद्युत पुरवठा देखील कायम राहील, याची हमी देखील महावितरणने दिली आहे. त्यामुळे उद्याचा मोर्चा रद्द करण्यात येत असल्याचे बंब यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in