प्रिय उल्हास, आम्ही राजकारणी तुला काहीच देऊ शकलो नाही..

मराठवाड्यातील उत्तम नेता म्हणून मी तुझ्याकडे बघायची, पण दुर्दैवाने सगळ्यांचे हसत स्वागत करणाऱ्या तुला आम्ही काहीच देऊ शकलो नाही. ( suryakanta patil, Nanded)
Suryakanta Patil- Ulhas Udhan
Suryakanta Patil- Ulhas UdhanSarkarnama

औरंगाबाद ः शहरातील राष्ट्रवादीचे नेते, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील माजी सिनेट सदस्य डाॅ. उल्हास उढाण यांचे आज पहाटे निधन झाले. (Ncp) ह्दयविकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली आणि राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्राला धक्काच बसला. (Marathwada) राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, (Sharad Pawar) नेते अजित पवार यांच्यासह सर्वच नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असलेले उढाण हे विद्यार्थीप्रिय देखील होते.

त्यांच्या निधनाने सगळ्यांनाच धक्का बसला. माजी केंद्रीय मंत्री व आता भाजपमध्ये असलेल्या सूर्यकांता पाटील यांना देखील उढाण यांच्या निधनाच्या वृत्ताने धक्का बसला. पाटील यांनी आपल्या फेसबूकवरुन उढाण यांच्याबद्दलच्या भावना व आठवणी व्यक्त केल्या. या भावूक पोस्टमध्ये त्यांनी उढाण यांना राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये कुठलेच पद तेव्हा आम्ही राजकाणी देऊ शकलो नाही, अशी खंत देखील व्यक्त केली.

सूर्यकांता पाटील आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, प्रिय उल्हास, हे असे जाणे अत्यंत क्लेशदाई आणि कधीच जखम भरून न येणारे आहे रे. किती आश्वासक होतास. तुला आम्ही राजकारणी काहीच देऊ शकलो नाही. याचा कायमचा व्रण आमच्या मनाव ठेऊन गेलास. आपले औरंगाबादेत भेटायचे ठरले होते. कायम कार्यरत असणाऱ्या तुला भेटायचे, बघायचे राहून गेले.

तुझ्या मनावर किती ओझे घेऊन तू मार्गक्रमण केलेस, याची मी साक्षीदार आहे. मराठवाड्यातील उत्तम नेता म्हणून मी तुझ्याकडे बघायची, पण दुर्दैवाने सगळ्यांचे हसत स्वागत करणाऱ्या तुला आम्ही काहीच देऊ शकलो नाही. एवढे दळभद्रे आम्ही कोणत्या तोंडाने तुला श्रद्धांजली वाहू. तुझ्या घरावर कोसळलेल्या ह्या विजेने सगळे जाळून खाक झालेय.

Suryakanta Patil- Ulhas Udhan
लातूर जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदी धीरज देशमुख बिनविरोध

हे काही तुझे जाण्याचे वय नव्हते, पण तू गेलास आम्हाला कायमचे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून. छे हे भलतेच घडले भावा. तू आम्हाला एकटे केलेस. तुझ्या आत्म्याला मुक्ती मिळेल.. तू वरतून आमच्याकडे बघून हसशील, तरी पण तुला विसरणे आम्हास शक्य होणार नाही. भावपूर्ण श्रध्दांजली

ओम शांती । डॉक्टर उल्हास उढाण आमच्यात नाहीत।

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com