दसरा मेळावा : उद्धव-शिंदे सेनेचा अडचणीत, पकंजा मुंडे यांची तयारी मात्र जोरात..

पंकजा मुंडे यांनी भक्तीगडावरील अपुर्ण राहिलेल्या कामांना गती दिल्याचा व्हिडिओ पोस्ट करत आपल्या समर्थकांना या मेळाव्याच्या तयारी लागा, असा संदेश दिला आहे. (Pankaja Munde)
Pankaja Munde & Uddhav Thackeray
Pankaja Munde & Uddhav Thackeray Sarkarnama

औरंगाबाद : मुंबईच्या शिवाजीपार्क अर्थात शिवतीर्थावर दसरा मेळावा उद्धव सेनेचा की शिंदे सेनेचा हा वाद चांगलाच पेटलाय. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत मुंबई महापालिकेने दोघांनाही परवानगी नाकारली आहे. (Beed) आता प्रकरण उच्च न्यायालयात पोहचले आहे. उद्धव-शिंदे सेनेचा दसरा मेळावा होणार की नाही? याकडे राज्याचे लक्ष लागलेले असतांनाच भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मात्र सावरगांवच्या भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू केली आहे.

पंकजा मुंडे यांनी भक्तीगडावरील अपुर्ण राहिलेल्या कामांना गती दिल्याचा व्हिडिओ पोस्ट करत आपल्या समर्थकांना या मेळाव्याच्या तयारी लागा, असा संदेश दिला आहे. (Maharashtra) महाराष्ट्राच्या राजकारणात दसरा मेळाव्यांना अन्यन साधरण महत्व आहे. शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा अगदी स्थापनेपासून म्हणजेच १९६६ पासून होतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेली ही परंपरा उद्धव ठाकरे यांनी पुढे सुरू ठेवली.

असाच चर्चेत असणारा दुसरा दसरा मेळावा आधी भगवान गडावर स्व. गोपीनाथ मुंडे यांचा व्हायचा. त्यांच्या निधनानंतर भगवानगडाचा वापर राजकारणासाठी नको अशी भूमिका घेत मुंडे यांच्या कन्या पंकजा यांना विरोध केला गेला आणि आता हा मेळावा गेल्या काही वर्षांपासून सावरगावच्या भगवान भक्तीगडावर घेतला जातो. गोपीनाथ मुंडे यांची मेळाव्याची परंपरा पंकजा मुंडे या समर्थपणे चालवत आहेत.

गेली दोन अडीच वर्ष राज्यात व देशात कोरोनाचे संकट होते. त्यामुळे कुठलेही राजकीय मेळावे, सभा झाले नाही. तसेच दसरा मेळाव्यांमध्ये देखील खंड पडला होता. परंतु आता कोरोनाचे संकट पुर्णपणे नाहीसे झाले असून जनजीवन सुरळीत झाले आहे. सर्व बंधने हटवल्यानंतरचा पहिला दसरा मेळावा दणक्यात करण्याचे प्रयत्न सुरू असतांनाच राज्यातील राजकीय घडामोडींचे सावट या मेळाव्यांवर आहे.

शिवसेना विरुद्ध शिंदे सेना असा संघर्ष राज्यात सुरू आहे. तर दुसरीकडे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना आमदारकी, मंत्रीपदापासून वंचित ठेवत संघटनेच्या जबाबदारीत अडकवण्याचे राजकारण काही वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे पंकजा समर्थक कमालीचे अस्वस्थ आहेत. पण त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत आपली भूमिका पंकजा यांनी स्पष्ट केलेली आहे.

Pankaja Munde & Uddhav Thackeray
शिवसेनेच्या 'दसरा मेळावा' याचिकेत शिंदे गटाचा 'हस्तक्षेप' अर्ज : उद्या होणार सुनावणी!

भगवान भक्तीगडावरील यंदा होणाऱ्या त्यांच्या दसरा मेळाव्याला देखील मोठे महत्व प्राप्त झाले आहे. महत्वाची राजकीय भूमिका जाहीर करण्यासाठी पंकजा यांनी नेहमीच भगवान-भक्तीगडालाच योग्य स्थान मानलेले आहे. राज्यातील सध्याची परिस्थिती आणि पंकजा यांची राजकीय वाटचाल या पार्श्वभूमीवर यंदाच्या दसरा मेळाव्याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

त्या दृष्टीने पंकजा मुंडे यांनी ट्विट करत व्हायरल केलेला व्हिडिओ आणि आवाहन चर्चेचा विषय ठरत आहे. पंकजा यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोविडमुळे अधूरे राहिलेले काम युद्ध पातळीवर सुरू आहे... त्या दिवसाच्या प्रतिक्षेत...तो दिवस आपला.. एक अनोखा दिवस... कोणता दिवस, कोणते स्थळ, आणि निमित्त काय ???.. तुम्हाला तर माहीत आहेच...लागा तयारी ला, अशा शब्दांत त्यांनी आपल्या समर्थकांना संदेश दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in