विनापरवानगी तुळजा भवानीचे दर्शन ; भाजपच्या अध्यात्मिक आघाडीच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल

(Bjp Tushar Bhosle)घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी मंदिरात फक्त पास (Tulja Bhavani Temple) असलेल्यांनाच परवागनी देण्यात आली होती. भोसले व त्यांच्यासह इतरांकडे अशी परवानगी नव्हती.
विनापरवानगी तुळजा भवानीचे दर्शन ; भाजपच्या अध्यात्मिक आघाडीच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल
Bjp Leader Tushar BhosleSarkarnama

तुळजापूर : तुळजा भवानी मंदीरात बेकायदा प्रवेश केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांच्यासह इतर लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनूसार भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले हे गुरूवारी दुपारी दोन वाजता तुळजा भवानी मंदीरात आले होते.

भोसले यांनी तुळजा भवानी मातेचे दश॔न घेतले व मंदीरातच प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर यांनी यासंदर्भात चौकशीसह कारवाईचे आदेश दिले होते. घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी मंदिरात फक्त पास असलेल्यांनाच परवागनी देण्यात आली होती.

भोसले व त्यांच्यासह इतरांकडे अशी परवानगी नसतांना त्यांनी मंदीरात प्रवेश करत दर्शन घेतले. शिवाय कोरोनाचे नियमही पायदळी तुडवले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर प्राधिकृत अधिकारी योगेश खरमटे यांनी यासंदर्भात कारवाई होईल असे स्प्षट केले होते.

यासंदर्भात तुळजा भवानी मंदीर समितीचे सहाय्यक व्यवस्थापक प्रवीण अमृतराव यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. भोसले यांनी मंदीरात इतरांसह प्रवेश करून कोरोनाचे नियम धाब्यावर बसवले होते. यासंदर्भात गुरूवारी मध्यरात्री गुन्हे दाखल दाखल करण्यात आले आहेत.

तुषार भोसले यांच्यासोबत असणारे लोक कोण होते? याचा तपास आता पोलीस करणार आहेत. दरम्यान राजकीय दबाव येऊन या प्रकरणाच्या तपासात ढिलाई केली जाण्याची चर्चा देखील सुरू आहे. भक्तांना मंदीर खुले करा, अशी मागणी करत राज्यभरात आक्रमक भूमिका घेतली होती.

Bjp Leader Tushar Bhosle
सरकारी पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते; छापेमारीवर शरद पवारांचं वक्तव्य

भोसले यांनी मंदीर उघडल्यानंतर मात्र विना परवानगी स्वत:च कुटुंबासह दर्शन घेतले. एवढेच नाही तर मास्क न घालता फोटोसेशनही केले. यावेळी त्यांच्याबरोब इतरही काहीजण उपस्थित होते. पोलिसांनी भोसले यांच्यासह त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले आहेत.

Related Stories

No stories found.